UPSC Result : वडील चहाच्या टपरीवर अन् आई बिडी वळायची; अहमदनगरच्या मंगेशचे डोळे दिपवणारे यश
UPSC Exam Result : घरची परिस्थिती जेमतेम, 3-4 एकर शेती अन् वडिलांचा चहाचा व्यवसाय, अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन अहमदनगरच्या मंगेश खिल्लारीने यूपीएससी(UPSC Exam) परीक्षेत यश मिळवलं आहे. मंगेश खिल्लारी याने यूपीएससी परीक्षेत 396 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत बाजी मारली आहे. परीक्षेत पास झाल्याचं समजताच मंगेश खिल्लारी(Mangesh Khillari) याने पहिली प्रतिक्रिया लेट्अपशी बोलताना दिलीय. यूपीएससी परीक्षेचं सुरुवातील मोठं अर्थिक चॅलेंज होतं पण आईवडिल ठामपणे उभे राहिल्यानेच परिक्षेत यश मिळालं, असं मंगेश खिल्लारीने सांगितलं आहे.
यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मंगेश खिल्लारी याने आत्तापर्यंत दोन वेळी परिक्षा दिली, मात्र, तिसऱ्यांदा मंगेश खिल्लारीने 396 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मंगेशचं प्राथमिक शिक्षण अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातल्या सुकेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर पुढील शिक्षण मंगेश पुण्यातल्या एसपी कॉलेजातून घेतलं. त्याचवेळी मंगेशने यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरु केला होता. त्यावेळी अर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मोठं अर्थिक चॅलेंज होतं पण आईवडिलांच्या सहकार्यानेच मला यश मिळाल्याचं मंगेशने सांगितलं आहे.
Aditya Singh Rajput : 17 व्या वर्षी करिअरची सुरुवात ते यशस्वी अभिनेता : कोण होता आदित्य सिंग राजपूत?
स्वत:च्या नोट्स काढून अभ्यास :
जेव्हा यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरु केला त्यावेळी समोर मोठं अर्थिक आव्हान होतं. घरची परिस्थितीही हलाखीची होती. त्यामुळे पुण्यातल्या क्लासेसमध्ये खरी हकीकत सांगितल्यानंतर मला त्यांनी फीमध्ये सवलत दिली. त्यानंतर शिक्षकांनीही मला योग्यवेळी योग्य मार्गदर्शन केलं. परीक्षेच्या अभ्यासक्रमानूसार मी स्वत:च्या नोट्स काढून 15 ते 16 तास अभ्यास करीत होतो. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर अधिक वेळ न घालवता योग्य वेळ देऊन अभ्सास केला पाहिजे, संयम आणि आत्मविश्वासाने तीन चार वेळा अपयश आल्यास दुसरा मार्ग निवडावा, असं आवाहन मंगेश खिल्लारीने केलं आहे.
राज्यात निवडणुका कधी लागणार? शरद पवारांनी थेट सांगितलं…
तसेच परीक्षेत पास झाल्यानंतर पहिल्यांदा आईवडिलांना फोन करुन सांगितलं, तेव्हा ‘शब्बास’ असे उद्गगार काढत वडिलांनी माझं अभिनंदन केलं असल्याचंही त्याने सांगितलं आहे. जेव्हा यूपीएससीचा अभ्यास सुरु केला त्यावेळी मी परीक्षेच्या अभ्साक्रमानूसार स्वत:च्या नोट्स काढून अभ्यास केला. पदवीचे शिक्षण सुरु असताना जसा वेळ मिळेल तसा अभ्यास माझा सुरु होता. दिवसातून जवळपास 15 ते 16 तास अभ्यास करत असल्याचं मंगेशने सांगितलं आहे.
अजित पवारांचं विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केलं मान्य, म्हणाले…
दरम्यान, स्पर्धा परिक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांनी संयम आणि आत्मविश्वासाने यश नक्कीच मिळतं, पण सारखं अपयश आल्यास विद्यार्थ्यांनी दुसरा मार्ग निवडावा असं आवाहन मंगेश खिल्लारीने केलं आहे. मी आत्तापर्यंत दोनवेळा यूपीएससी परीक्षा दिली आहे, त्यानंतर तिसऱ्यांदा मला यश मिळालं असून मला खूप आनंद झाला आहे. एक खेड्यातला विद्यार्थी यूपीएससीमध्ये 396 व्या क्रमांकाने यश मिळवतो ही मोठी बाब असल्याचं मंगेश खिल्लारीने स्पष्ट केलंय.