एमआयडीसीला मंजुरी देण्याची कृपा करुन हाताला काम द्या, युवकाचं उद्योगमंत्र्यांना रक्तरंजित पत्र…

मागील काही दिवसांपासून नगर जिल्ह्यासह राज्यात कर्जत-जामखेड एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधी गटातील दोन लोकप्रतिनिधी देखील या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. मात्र, अद्यापही हा प्रश्न मार्गी लागला नाही. कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी आता एका युवकाने आपल्या रक्ताने थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवले आहे. या मागणीसाठी आत्तापर्यंत मोठे आंदोलने देखील झाली आहेत. […]

Karjat Jamkhed MIDC

Karjat Jamkhed MIDC

मागील काही दिवसांपासून नगर जिल्ह्यासह राज्यात कर्जत-जामखेड एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधी गटातील दोन लोकप्रतिनिधी देखील या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. मात्र, अद्यापही हा प्रश्न मार्गी लागला नाही. कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी आता एका युवकाने आपल्या रक्ताने थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवले आहे. या मागणीसाठी आत्तापर्यंत मोठे आंदोलने देखील झाली आहेत. अशातच आता उद्योगमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी रक्तरंजित पत्र पाठवण्यात आले आहे.

लग्न समारंभात बॉलीवूडची गाणी वाजवल्यानं कॉपीराईटचं उल्लंघन होतं?; केंद्राचे स्पष्ट निर्देश

गेल्या काही दिवसांपासून कर्जत जामखेड मतदारसंघातील एमआयडीसी मंजुरीचा मुद्दा हा चांगलाच तापला असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी या मंजुरीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधान भवन परिसरात आंदोलन केले होते.

दरम्यान आमदारांपाठोपाठ नागरिकांनी तसेच मतदार संघातील युवकांनी देखील आंदोलने केली मात्र एवढं सगळं करूनही शासन अजूनही एमआयडीसीला मंजुरी देत नाही. यामुळे हताश झालेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातील नान्नज या गावातील अमर चाऊस या युवकाने स्वतःच्या रक्ताने थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना एमआयडीसी लवकरात लवकर मंजूर करून द्यावी, यासाठी पत्र लिहिले आहे.

सरकार किती खोटं बोलणार? आव्हाडांकडून भिडेंच्या सुरक्षेचा पुरावाचा सादर



पत्रात नेमकं काय म्हटलं?

उद्योगमंत्री उदय सामंत साहेब, एक सर्वसामान्य बेरोजगार युवक म्हणून आमच्या कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व युवा व नागरिकांच्या वतीने माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आमच्या हक्काच्या एमआयडीसीला कृपा करून मंजुरी द्या आणि आमच्या हाताला काम मिळू द्या! आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा आणि गंभीर परिस्थितीचा विचार करून रोहितदादांच्या एमआयडीसीबाबतीतच्या मागणीला मान्य करा एवढीच कळकळीची विनंती!

दरम्यान, कर्जत-जामखेड एमआयडीसीवरुन आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवारांमध्ये चांगली धुमश्चक्री झाल्याचं पाहायल मिळालं. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. त्यानंतर आता या युवकाने थेट उद्योगमंत्र्यांना रक्तरंजित पत्रच लिहिल्याने आता तरी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागेल की नाही? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version