Download App

कोल्हापूरात येत्या दोन महिन्यांत दंगली घडविण्याचे कारस्थान; सतेज पाटलांच्या दाव्याने खळबळ

Satej Patil On BJP :  काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ४० टक्केचा कर्नाटक पॅटर्न कोल्हापूर राज्यातही सुरू होणार की काय अशी शंका लोकांमध्ये निर्माण होते की काय ? असा प्रश्न विरोधी पक्षाला होत आहे, असा आरोप सतेज पाटलांनी केला आहे.  तसेच आमच्या काळा मध्ये काही पैसे मंजुर झाले होते, त्या पैश्यांची ऑर्डर पुन्हा बदलणे, रस्त्यासाठी मंजुर झालेले पैसे दुसऱ्या कामासाठी बदलणे इतके चुकिची प्रशासकीय यंत्रणा आम्ही बघितली नाही, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

शिवतीर्थवर लॉजिंग-बोर्डिंग सुरु करावं; फडणवीसांच्या भेटीनंतर राऊतांनी दिली बिझनेस आयडिया

आमदार म्हणून जयश्री जाधव असतील किंवा पूर्वी चंद्रकांत जाधव असतील, आणि आता ऋतूराज पाटील असतील, यांनी सूचवलेली कामाला प्रधान्य देले आहे . दक्षिण मधील कामांना हाय कोर्टाने स्टे दिला आहे.
आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे. लोकप्रतीनिधींचा सामना हा राहिला पाहिजे ही  आमची भूमिका आहे. शासन आपल्या दारी याने काय होणार आहे. नुसती गर्दी गोळा करुन नेमके काय होणार आहे, असे म्हणत त्यांनी सरकारला सुनावले आहे.

Gautami Patil च्या कार्यक्रमाला अजितदादा येणार? …म्हणून चर्चांना आले उधाण

कोल्हापूरमध्ये अशांतता रहावी याचा प्रयत्न सातत्याने होत आहे, हे दिसून येत आहे. याचा फायदा कोणत्या राजकीय पक्षाला होत आहे हे दिसून येत आहे. कोल्हापूर ही छत्रपत्ती शाहू महाराज यांची  भूमी आहे.
कोल्हापुरात येत्या दोन महिन्यांत दंगली घडवण्याचे कारस्थान सुरु आहे. ठराविक पक्षाला दंगली हव्या आहेत. मिरज दंगली नंतर जास्त संख्येने आमदार निवडून आल्याने हाच कित्ता पुन्हा गिरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सतेज पाटलांनी केला आहे.

Tags

follow us