Hasan Mushrif : कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता. गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागाच्या विविध भागाच अजूनही बंद पाळण्यात येतोय. यावरुन राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी मुस्लिम समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे आवाहन केले. (kolhapur-hasan-mushrif-said-to-spoil-the-atmosphere)
Priyanka Gandhi : नर्मदा पूजा अन् शंखनाद… काँग्रेसने भाजपस्टाईल फोडला प्रचाराचा नारळ!
हसन मुश्रीफ म्हणाले की, गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूरचं वातावरण सातत्यानं बिघडत आहे. वास्तविक मी आमच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त जाहीरपणानं आवाहन केलं होतं की, छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिमांच्याविषयी कधीही आकस नव्हता. मुस्लिम समाजाच्या मनामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कधी आकस राहिलेला नाही.
गेला आठवडा झाला कोल्हापूरातील वातावरण बिघडलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना कधी मुस्लिमांबद्दल आकस नव्हता. तसेच मुस्लिम समाजालाही त्यांच्याबद्दल कधीच आकस राहिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर जीवाची बाजी लावून महाराजांची आग्र्याहून सुटका करणारे मदारी मेहतर… pic.twitter.com/iQCj4qu8Pk
— NCP (@NCPspeaks) June 12, 2023
तुम्ही इतिहास पाहिलेला असेल तर वास्तविक गोविंदराव पानसरे यांचं शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलं असेल तर त्यामध्ये 22 सरदार आणि प्रमुख मग तो नौदलाचा असेल त्यांचा वकील असेल किंवा त्यांचा अंगरक्षक असेल ज्यांनी शिवाजी महाराजांसाठी जीवाची बाजी लावून आग्र्यातून सुटका करण्यासाठी प्रयत्न केला तो मदारी मेहतर असतील असे 22 वतनदार आणि सैन्याचे प्रमुख जर महाराजांकडे असतील तर असे विश्वासू माणसं असल्याशिवाय महाराज त्यांना आपल्याजवळ कसं ठेवतील, ती हिंदवी स्वराज्याची लढाई होती.
कर प्रणालीवर अश्नीर ग्रोवरचे मोठे विधान, सोशल मीडियावर खळबळ
त्यानंतर इतके जर 22 लोक असतील तर त्यामध्ये मावळे किती मुस्लिम असतील, आणि मग जर इतक्या मावळ्यांसोबत औरंगजेबाच्या सैन्याशी लढाई जर झाली असेल तर मग औरंगजेब आपला होऊच शकत नाही, म्हणून मुस्लिम धर्मियांनी आपली जी लहान मुलं आहेत त्यांना आपला इतिहास समजावून सांगण्याची गरज असल्याचे यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले.
त्याचवेळी हसन मुश्रीफ म्हणाले की, टिपू सुलतानचे स्टेटस ठेवल्याने वातावरण बिघडले होते. त्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अशा घडणाऱ्या घटनांसाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अशा घटनांबाबद पोलिसांनी सतर्क राहण्याची गरज आहे. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप हसन मुश्रीफांनी केला आहे. हिंदू-मुस्लिम समाजाने एकमेकांमध्ये सलोख्याने शांतता राखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन हसन मुश्रीफांनी केले आहे.