Download App

पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल; कोल्हापूर पुन्हा महापुराच्या उंबरठ्यावर; कलेक्टर ऑफिसमध्ये सामानाची बांधाबांध

kolhapur Flood : कोल्हापुरात यंदाच्या वर्षीही महापुराचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा कोल्हापुर महापुराच्या उंबरठ्यावर आलं आहे. कारण पंचगंगा नदीने इशारा पातळीकडे वाटचाल सुरु असून नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये उतरल्याचं दिसून येत आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सरसावले! पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश…

प्रशानसकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील सामानाची आवराआवर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडून ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. यासोबतच जिल्ह्यातील 28 गावांतील शाळा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आले आहेत. ही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली आहे.

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठीपासून शेतकऱ्यांसाठीचा एक रुपयात पीकविमा; विधानपरिषदेत चर्चेला धनंजय मुंडेंची उत्तरं

जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर संबंधित शाळेत निवारा केंद्र उभारली जाणार असून शासकीय कागदोपत्रांनाही सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कागदपत्रे सुरक्षितस्थळी नेण्यासाठी धडपड करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.

काँग्रेसमध्येही स्फोट होणार! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं पुढचं टार्गेट

दरम्यान, कोल्हापुरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच भागांत पाणीच पाणी झाल्याचं दिसून येत आहे. पंचगंगा नदीने पातळी ओलांडल्याने शहराच्या दिशने पाणी जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंचगंगा नदीसह जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांना पूर आला आहे. 82 हुन अधिक बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक मार्गावर पाणी आले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.

भिंत कोसळल्याची घटना :
नूकतीच कोल्हापूरच्या खासबाग मैदानात भिंत कोसळल्याची घटना घडली असून भिंतीखाली दोन महिला अडकल्या आहेत. महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत अधिक माहिती समोर आलेली नसून कर्मचाऱ्यांकडून महिलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

कोल्हापुरातली सध्याची परिस्थिती पाहता प्रशासना अलर्ट झालं असून कोल्हापुरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्याचे तत्काळ स्थलांतर करण्याबाबत स्पष्ट केले आहे.

Tags

follow us