कोल्हापुरात उद्या 7 जून रोजी हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलीय. काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या समाजकंटकांवर कारवाईच्या मागणीसाठी उद्या कोल्हापुर बंदची हाक देण्यात आलीय.
Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती; मुंबईसह कोकणाला सतर्कतेचा इशारा
नेमकं प्रकरण काय?
कोल्हापुरातील काही तरुणांनी औरंगजेबाचं समर्थन करणारी पोस्ट स्टेटसवर ठेवल्याचा प्रकार घडला. औरंगजेबाचं समर्थन करणारी पोस्टबद्दल समजताच काही हिंदुत्ववादी तरुणांनी हातात भगवे झेंडे घेत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा देत लक्ष्मीपुरा पोलिस ठाण्यासमोर एकच गर्दी केली. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
BMC Elections: ठाकरे गटाची चांदी, राष्ट्रवादीही साधणार डाव? अजितदादांनी केला मोठा खुलासा
कोल्हापुरात जवळपास सहा ते सात अशी प्रकरणे उघडकीस आल्याचा आरोप हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. या प्रकरणी शाहपुरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आक्षेपार्ह पोस्टनंतर कोल्हापुरातील शिवभक्त पेटून उठले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ उद्या कोल्हापूर बंदची हाकही या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, नूकतीच अहमदनगरमधील संगमनेरमध्ये दोन गटांत तुफान वाद झाल्याची घटना घडली. त्यानंतर लगेचच कोल्हापुरात हा प्रकार घडला. अहमदनगरच्या संगमनेरमध्ये विविध मागण्यांसाठी हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दोन गटांत वाद झाला आहे. त्यानंतर दोन गटांत दगडफेक झाली. मोर्चानंतर ही दगडफेक झाल्याने परिसरांत तणावपूर्ण परिस्थिती आहे.