Deepak Kesarkar : कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केसरकर यांनी काल कोल्हापुरात असताना थेट राजीनामा देण्याचे वक्तव्य केल्याने या चर्चा सुरू झाल्या आहेत. शारदीय नवरात्रोत्सवात आई अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दर्शन मंडपासाठी इमारत उपलब्ध करून देण्याबाबत शेतकरी संघाला प्रस्ताव दिला होता. त्याकडे संघाने दुर्लक्ष केले. त्यामुळे इमारत ताब्यात घेण्याची वेळ आली. यात माझा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही. जर तसे काही सिद्ध झाले तर मी पालकमंत्रीपदाचा राजीनामा देईन, असे वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
Video : मराठी माणसाला घर नाकारलं; महिलेने रडूनच हकीकत सांगितली…
मंत्री केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चांना मात्र चांगलेच उधाण आले आहे. ते पुढे म्हणाले, शेतकरी संघाने दिलेल्या संयुक्त सुविधा निर्माण करण्याच्या प्रस्तावावर आता जिल्हाधिकार काय तो निर्णय घेतील. पर्यटनाच्या माध्यमातून कोल्हापूरचा विकास करण्याचा माझा प्रयत्न आहे. शेतकरी संघाची इमारत ताब्यात घेण्यावरून होणारे सर्व आरोप धादांत खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत. संघाची जागा हडप करण्याचा आरोप जर सिद्ध झाला तर तत्काळ पालकमंत्रीपदाचा राजीनामा देईल पण, मी खोटे आरोप कधीच सहन करणार नाही असे केसरकर म्हणाले.
खासगी कंपन्यांच्या सीएसआर निधीतून शाळांच्या इमारतींची देखभाल दुरुस्ती आणि आवश्यक सोयासुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. शाळांच्या व्यवस्थापनात कोणताही बदल केला जाणार नाही. तसेच राज्यातील एकही शाळा खासगी केली जाणार नाही असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांनाही उत्तर दिले. शाळांच्या विकासासाठी कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे.
‘पटोलेंना भाजप समजली नाही, स्फोट भाजपमध्ये नाही कॉंग्रेसमध्ये…’; बावनकुळेंचं मोठं विधान