Download App

‘भाजपाच्या मेहेरबानीने पालकमंत्रिपद, चौकटीत राहून काम करा’; भाजप नेत्याचा मुश्रीफांना इशारा

Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण (Kolhapur Politics) म्हटलं की समरजीत घाटगे आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यातील राजकीय संघर्ष कोल्हापुरातील जनतेसाठी नवा नाही. आताही मुश्रीफ भाजपबरोबर आले, कोल्हापूरचं पालकमंत्रीपदही मिळवलं तरी देखील दोन्ही नेत्यांतील संघर्ष कमी झाला नाही. आताही दोघांतील संघर्षात वाढ होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हसन मुश्रीफ यांना भाजपाच्या मेहेरबानीमुळे पालकमंत्रीपद मिळालं असून त्यांना भाजपाच्या चौकटीत राहून काम करावं लागेल. जर का त्यांनी चौकट ओलांडली तर त्यांच्यासमोर मी उभा असेन. मुश्रीफ मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही. पालकमंत्री तर सोडाच, त्यांच्याशी माझा संघर्ष अटळ आहे. संघर्ष जितना बडा होगा, जीत उतनी शानदार होगी असं समरजित घाटगे म्हणाले.

Devendra Fadnavis : अजितदादा मुख्यमंत्री होणार? फडणवीस म्हणाले, आमच्या शुभेच्छा पण…

कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून स्वप्न पूर्ण झालं नव्हतं. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांना नगर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे मुश्रीफ कॅबिनेट मंत्री होऊनही कोल्हापूरचे पालकमंत्री होऊ शकले नाही. आता मात्र महायुतीच्या सरकारमध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता ते भाजपबरोबर आले आहेत त्यामुळे दोन्ही नेत्यांतील संघर्ष कमी होईल अशी शक्यता होती. परंतु, घाटगे यांच्या वक्तव्याने संघर्ष आणखीच वाढेल असे दिसत आहे.

मुश्रीफांशी माझा संघर्ष अटळ

हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री पद सोडाच, मुख्यमंत्रीपद मिळाले तरी मला काही फरक पडणार नाही. त्यांच्याशी माझा संघर्ष अटळ आहे. त्यामुळे संघर्ष जितना बडा होगा, जीत उतनी शानदार होगी असे घाटगे म्हणाले. घाटगे यांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही नेत्यांतील राजकीय संघर्ष आागामी काळात कमी होईल अशी चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. हसन मुश्रीफ यांनाही भाजपाच्या हाताखाली कसं काम करावं लागेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

पक्षातील लोकं का गेली हे पवार साहेबांना चांगलंच ठाऊक; फडणवीसांनीही दिलं करेक्ट उत्तर

Tags

follow us