Devendra Fadnavis : अजितदादा मुख्यमंत्री होणार? फडणवीस म्हणाले, आमच्या शुभेच्छा पण…
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल अजित पवारांबाबत वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानाचा अर्थ सांगताना अजितदादा (Ajit Pawar) मुख्यमंत्री होऊ शकतात असे राज्य सरकारमधील मंत्री धर्मरावबाबा अत्राम म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत असतानाच आता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करत मंत्री अत्राम यांचे कान टोचले आहेत.
फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना मंत्री अत्राम यांच्या वक्तव्याबाबत विचारले. त्यावर फडणवीस अत्राम यांचे नाव न घेता सूचक शब्दांत इशारा दिला. ते म्हणाले, जो जो राजकारणात आहे त्याला कधी ना कधी कुठेतरी संधी मिळणार आहे. अजितदादा त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यामुळे निश्चितच आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठिशी आहेत. पण वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे की सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार आहेत. शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही एकत्रितपणे पुढील निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. कालही मी अतिशय स्पष्टपणे बोललो परंतु, काही लोकांना ते नीट समजत नाही त्यांनी ते समजून घेतले पाहिजे.
पक्षातील लोकं का गेली हे पवार साहेबांना चांगलंच ठाऊक; फडणवीसांनीही दिलं करेक्ट उत्तर
लोकं बाहेर का पडली हे पवार साहेबांना ठाऊक
माझं एवढंच म्हणणं आहे की 2019 ला शरद पवार साहेबांनी आमच्याशी चर्चा केली होती आणि ते आमच्यासोबत यायला तयार होते. तर मग ते कोणत्या एजन्सीला घाबरून आमच्याबरोबर येत होते का? याआधी 2017 मध्ये देखील त्यांनी आमच्याशी चर्चा केली होती. त्यावेळीही ते कुठल्या एजन्सीला घाबरून येत होते का?, तेव्हा मला असं वाटतं की पवार साहेबांना हे चांगलं माहित आहे की त्यांच्या पक्षातील लोकं का बाहेर पडले.
शिंदे दिल्लीला का गेले? फडणवीसांनी सांगितलं
मी दिल्लीला जाणार नाही. एकनाथ शिंदे हे नक्षलवादाच्या संदर्भात नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक त्या ठिकाणी घेण्यात येत आहे त्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत, असे उत्तर फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.
Mahavikas Aaghadi : जागा वाटपाचा घोळ 9 नेते सोडविणार; चव्हाण, राऊत, पाटलांच्या खांद्यावर धुरा