Download App

Kolhapur : तणावपूर्ण शांतता, तगडा बंदोबस्त… : पेटलेल्या कोल्हापूरमध्ये काय आहे सद्यस्थिती?

कोल्हापूर : पेटलेल्या कोल्हापूर (Kolhapur) शहरातील स्थिती आता हळू हळू पूर्वपदावर येत आहे. तणाव निवळत असून अनेक भागांतील दुकाने सुरु झाली आहेत. शहरात 2 दिवसात झालेल्या राड्याप्रकरणी 3 पोलीस स्थानकांमध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात सुमारे 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच 36 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. ते आज (8 जून) पत्रकार परिषदेत बोलत होते. (Kolhapur-riots-sp-Mahindra-pandit-told-about -current-Kolhapur-situation)

मंहेंद्र पंडित म्हणाले, शहर आणि जिल्ह्यातील तणाव निवळत असून सद्यस्थिती सामान्य आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या 4 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय 1 अतिरिक्त पोलीस अधिक्षक, 2 पोलीस उपाधिक्षक, 10 पोलीस निरिक्षक, 60 पोलीस उपनिरीक्षक, 300 पोलीस कर्मचारी, 500 होमगार्ड्स असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोबतच इचलकरंजी, गडहिंग्लज, आजरा इकडे अतिरिक्त कुमक पाठवली आहे.

अटक केलेल्यांमध्ये 3 जण अल्पवयीन :

महेंद्र पंडित यांनी सांगितले की, दुकाने पूर्णपणे उघडल्यानंतर पोलीस तिथल्या सीसीटीव्हीचा तपास करुन गुन्हा दाखल करतील. आतापर्यंत 36 जणांना अटक केली आहे. यातील 3 जण अल्पवयीन आहेत. या तिघांना बाल न्यायालयात हजर करून पुढील कारवाई केली जाईल. दंगलीला जबाबदार असलेल्यांपैकी कुणाचीही गय करणार नाही.  पोलिस सर्वांवर कारवाई करतील, असे आश्वासन त्यांनी दिले. तसंत या मुलांना हे स्टेट्स ठेवण्यासाठी कुणी प्रवृत्त केले होते का?, याचा शोध घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Rahul Narvekar : लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार; नार्वेकरांच्या वक्तव्याने खळबळ

इंटरनेट सेवा आज रात्रीपर्यंत बंद राहणार :

दरम्यान, काल अफवांना आळा बसावा आणि खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी शहरातील आणि जिल्ह्यातील इंटरनेट सेवा कालपासून बंद केली आहे. ही इंटरनेट सेवा आज रात्री 12 वाजेपर्यंत बंदच राहणार आहे. तोपर्यंत तणाव पूर्णपणे निवळलेला असेल. आताच अनेक भागांतील दुकाने सुरू झाली आहेत, अशी माहितीही पोलिस अधीक्षकांनी दिली.

Tags

follow us