Download App

कुणाल भंडारी हल्ला प्रकरण विधानसभेत गाजलं! नितेश राणेंचा आक्रमक पवित्रा

अहमदनगर : अहमदनगर शहरातील रामवाडी परिसरातील कुणाल भंडारी हल्ला प्रकरण विधानसभेच चांगलंच गाजलं आहे. या घटनेतील आरोपी अफजल शेखवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. या घटनेप्रकरणी राणे विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत.

पालकमंत्री दीपक केसरकरांना नागरिकांचा घेराव

नितेश राणे म्हणाले, औरंगाबादच्या नामांतरानंतर काही हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवला. त्यानंतर या लोकांना टार्गेट करत त्यांना रॉडने मारहाण करण्यात आली. इतकंच नाहीतर आरोपींनी सबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन महिलांचा विनयभंग करत घरात तोडफोड केल्याचं राणेंनी विधानसभेत सांगितलंय.

आरोपींवर कलम 307 नूसार गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक आणि एसपींच्या सहकार्याने आरोपीला न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीनही मिळाला. यामध्ये पोलिसांकडून आरोपींना मदत केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

मुख्यमंत्री शिंदेंसाठी का खास आहेत शंभूराज देसाई? शिंदे-देसाई यांच्यातील राजकीय मैत्री आहे तरी कशी?

या घटनेप्रकरणी अफजल शेखवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करणार का? तसेच या घटनेत आरोपींना मदत करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? अशी लक्षवेधी आमदार नितेश राणे यांनी मांडलीय.

नितेश राणेच्या लक्षवेधीवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी कडाडून विरोध करत ही लक्षवेधी सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी उपस्थित केली असून गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे, गुन्हेगाराला कोणताही धर्म लागता कामा नये, समाजात बंधुभावतेची भावना तयार झाली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

प्रकरणाची फेरतपासणी होणार :
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जे काही घडलंय त्या प्रकरणी फेरतपासणी करण्यात येणार असून स्थानिक पोलिसांची या प्रकरणात काही चूक झाली असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us