मुख्यमंत्री शिंदेंसाठी का खास आहेत शंभूराज देसाई? शिंदे-देसाई यांच्यातील राजकीय मैत्री आहे तरी कशी?

मुख्यमंत्री शिंदेंसाठी का खास आहेत शंभूराज देसाई? शिंदे-देसाई यांच्यातील राजकीय मैत्री आहे तरी कशी?

मुंबई (प्रफुल्ल साळुंखे) : उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai हे सतत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या कानाला लागतात, अशी टीका काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. दरम्यान, असं काय खास आहे शंभूराज देसाई यांच्यात? मुख्यमंत्री शिंदे आणि देसाई यांच्यातील मैत्री नेमकी कशी आहे? याच विषयी जाणून घेऊ.

शिवाजीराव देसाई यांच्या निधनानंतर अवघ्या 21 व्या वर्षी शंभूराज देसाई यांच्यावर लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा आली. त्यानंतर ते राजकारणात आले. शंभूराज देसाई हे 2004 मध्ये शिवसेनेतून निवडणूक लढवून ते पहिल्यांदा निवडून आले होते. यामात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांना विजय खेचून आणता आला नाही. मात्र, त्यांनंतर झालेल्या दोन्ही विधानसभा (2014 आणि 2019) निवडणूकीत त्यांनी विरोधी उमेदवारां धुळ चारत विजयाचा गुलाल उधलला होता.

देसाई हे सीएम शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळं आताच नाही तर अगदी मुळ शिवसेनेत असल्यापासून शंभुराज देसाई यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे सतत उभे राहिले आहेत. देसाई यांच्या राजकीय जीवनात मुख्यमंत्री शिंदे याचं महत्व प्रचंड आहे. कारण, 2014 ते 2019 या कालावधीत राज्यात भाजप-सेना सरकार होतं. मात्र, या सरकारमध्ये देसाई यांना मंत्रीपदं मिळेल अशी शक्यता बोलली जात होती. मात्र, भापज-सेना सरकारमध्ये त्यांना पदाने हुलकावनी दिली. मात्र, 2019 ला राज्यात सत्तांतर झालं तेव्हा देसाईंना राज्य मंत्री करण्यात आलं, त्यावेळी शिंदे यांनीच त्यांच्या नावाचा आग्रह केला होता. त्यामुळं देसाई यांचं एकनाथ शिंदे यांच्याशी सख्ख्यं निर्माण झालं. देसाई हे कुठल्याही निर्णय प्रक्रियेत शिंदे यांच्या सोबत असतात. एकनाथ शिंदे हे पक्षात नाराज असताना देसाई हे शिंदे यांच्या सोबत सतत राहिले होते.

Pandit Dhirendra Krishna Shastri : भारत हा देश हिंदू राष्ट्र बनून राहणार

एकनाथ शिंदे बंडाच्या पुर्वी आमदारांची जमवाजमव करण्यात देसाई यांची भूमिका मोलाची होती. त्याच बरोबर गुवाहाटी सूरत येथे एकनाथ शिंदे गटाची बाजू मुद्देसुद मांडण्याची जबाबदारी देसाईकडे देण्यात आली होती. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शंभुराज देसाई यांना राज्यमंत्र्याच्या दर्जावरून कॅबीनेटचा दर्जा त्यांना देण्यात आला. विशेष म्हणजे देसाई यांना आवडीचं राज्य उत्पादन शुल्क हे मोठं खातंच त्यांना त्यांना देण्यात आलं. राज्याच्या उत्पन्नात सर्वाधिक भर घालणारा महत्त्वपूर्ण विभाग आहे.

देसाई यांनी शिंदे गटाची बाजू कायम लावून धरली. मिंधे सरकार, खोके-ओके अशा विरोधीपक्षातून होणाऱ्या टीकेला जोरदार प्रत्यूत्तर देण्याचं काम देसाई यांनी केलं. देसाई यांनी अनेकदा ठाकरे गटाची तोफ असलेले संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्याकडून होणाऱ्या टीकेला त्याच भाषेत उत्तर देऊन या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.

सध्या सहकार विभाग, साखर कारखाने, सूतगिरणी, सूतगिरणीचे प्रश्न समजावून देण्याची जबाबदारी देखील देसाई यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे यांनी अधिक विश्वास दाखवतं देसाई यांच्याकडे सातारा सोबत स्वत:च्या ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील सोपवली आहे. सातारा जिल्हात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच जन्मगाव आहे. म्हणजेच शिंदे यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी या दोघांच्याही पालकतत्वाची जबाबदारी देसाई यांच्याकडे आहे.

आताही मंत्रिमंडळ बैठकी असोत की, अधिवेशनाची जबबदारी असो… देसाई हे शिंदे यांच्यासोबत सावली सारखे दिसतात. तसाच एकनाथ शिंदे हे देखील देसाई यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube