Madha Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) तिसऱ्या टप्प्यांत माढा लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान पार पडलं. पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज लढतींपैकी एक लढत म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघातील धैर्यशील मोहिते पाटील (Dharyasheel Mohite Patil) आणि रणजित नाईक निंबाळकर (Ranjeet Naik Nimbalkar) यांच्यातील लढत. याच मुख्य कारण म्हणजे मागील लोकसभा निवडणुकांमध्ये मोहिते पाटलांच्या शब्दावर माळशिरस-अकलूज तालुक्यातून लिड मिळालं होतं. आता एकेकाळी निंबाळकरांसाठी मदत करणारे मोहिते पाटील रिंगणात उतरल्याने माढ्याचा पुढचा खासदार कोण असेल? याची उत्सुकता सर्वांनाच लागलीयं. माढ्यासाठी भाजपकडून खेळ्या खेळण्यात आल्याचं दिसून आलंय, तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटल्याने शरद पवारांनीही उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरीस मोहिते पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब करत चाल खेळली. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत वाढली. दोन्ही बाजूने आपल्या उमेदवारांसाठी मोठी ताकद लावण्यात आल्याचं प्रचारात दिसून आलं होतं.
गतवर्षीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला…
मागील लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मदारसंघात 63.58 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी आहे. तर यंदाच्या निवडणुकीत माढ्यात 60 टक्के मतदान पार पडलं. त्यामुळे यावर्षी मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून आलं. माढ्यातून सर्वाधिक मतदान हे फलटण तर सर्वात कमी मतदान करमाळ्यात झाल्याचं दिसून आलं. फलटणमध्ये 64 तर करमाळ्यात 55 टक्के मतदान पार पडल्याचं दिसून आलंय. यासोबतच माढा तालुक्यात 61, माळशिरस 60, माण तालुक्यात 58 टक्के मतदान झाले. तर तणावपूर्ण वातावरणातही सांगोला तालुक्यात 60 टक्के मतदान झाले.
निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत :
सध्या राज्यात शेतकऱ्यांना मोठ्या अर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागत आहे. अवकाळी पाऊसाचं संकट शेतकऱ्यांभोवती भोवतंय तर दुसरीकडे पिकालाही म्हणावं तसा भाव मिळत नाही. विशेष म्हणजे पाण्याचा प्रश्न, ओद्योगिक क्षेत्रातील प्रश्न, कांदा प्रश्न, मराठा आरक्षण, या मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं.
तीन वेळा मंत्रिपदाला नकार, सरकारी वाहनही नाकारलं; वाराणसीच्या पहिल्या खासदाराचं साधं पॉलिटिक्स
मतदारसंघात खेड्यापाड्याचं मतदान अधिक :
माढा मतदारसंघात माशळशिरस, फलटण, माण-खटाव, माढा, करमाळा, सांगोला, असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांमध्ये फलटण शहर सोडून बाकीची सर्वच मतदारसंघ ग्रामीण भाातील आहेत. त्यामुळे माढ्यातला पुढील खासदार हा ग्रामीण भागातील मतदारांवरच अवलंबून असणार आहे. तर अकलूज आणि माळशिरसस तालुक्यातील मतदारांचा कौल या निवडणुकीचा महत्वाचा मानला जात आहे.
निंबाळकरांकडे पक्षीय बल पण मोहितेंनाचं बळ :
करमाळ्यात संजय मामा शिंदे हे अपक्ष आमदार अजितदादांसोबत आहेत. त्यांनी मागील वर्षी रणजितसिंहाविरोधातच निवडणूक लढवली होती. अनेक वर्षे आमदार राहिलेले जयंतराव जगताप हेही भाजपबरोबर आहेत. तसेच बागल यांचा गट तर चिवटे हेदेखील भाजपच्या बाजूने आहेत. तर माजी आमदार नारायण पाटील शरद पवार यांच्यासोबत असल्याने या भागात मोहिते पाटलांना मोठं बळ मिळणार आहे. पक्षीय गणितात निंबाळकरांची बाजू भक्कम असली तरीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या भागात अनेकांनी तुतारीच हाती घेतल्याची परिस्थिती असून या भागातून निंबाळकरांना फटका बसण्याची शक्यता आहे.
मोहिते पाटलांना अभयसिंह जगतापांची मोठी मदत :
यंदाच्या निवडणुकीसाठी निंबाळकरांसाठी आमदार जयकुमार गोरे तर मोहिते पाटलांसाठी प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, ठाकरे गटाचे शेखर गोरे, रणजितसिंह देशमुख रिंगणात उतरुन ताकद लावत होते. तर शरद पवार गटाचे अभयसिंह जगतापांनीही चांगलाच प्रचार केलायं. मागील पाच ते सहा वर्षापासून ते शरद पवारांसोबत सक्रियपणे काम करत आहेत. तालुक्यातही त्यांचं मोठं योगदान असल्याने या भागातून मोहिते पाटलांना मोठं मताधिक्य मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
शेकापने मोहितेंसाठी विडा उचलला :
एकीकडे निंबाळकरांसाठी आमदार शहाजीबापू पाटील तर माजी आमदार दीपक साळुंखे मतदारसंघात तळ ठोकून होते तर मोहिते पाटलांसाठी शेतकरी कामगार पक्षाने पुढाकार प्रतिष्ठाच पणाला लावल्याचं दिसून आलं आहे. माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुखांसह बाबासाहेब देशमुख यांनी शरद पवारांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेत मोहिते पाटलांसाठी मतदारसंघ पिंजून काढल्याचं सांगितलं जात आहे. निंबाळकर हे देशमुखांच्या कामाला स्वत:चं नाव लावत प्रचार करत असल्याचा दावा करत देशमुख बंधूंनी मोहिते पाटलांसाठी जोरदार प्रचार केला. त्यामुळे निंबाळकरांना चितपट करण्यासाठी मोहिते पाटलांची ही जमेची बाजू ठरु शकते, असाही अंदाज आहे.
माढ्यात निंबाळकरांसाठी अनुकूल परिस्थिती :
माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे आणि शिवसेनेचे शिवाजी सावंत हे दोन्ही प्रमुख गट एकत्र आल्याने बहुतांश ठिकाणी मनोमिलन झालेले दिसून आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दुसऱ्या स्तरातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोहिते पाटलांसोबत आहेत. शिवसेनेच्या संजय कोकाटे यांनीही निवडणुकीपूर्वी पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता, माढ्यात अशी परिस्थिती असली तरीही रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती असण्याची शक्यता आहे.
रामराजेंचा विरोध पण निंबाळकरांचं वर्चस्व :
फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळीही रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध कायम ठेवला आहे. त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांनी अजितदादांसोबत असूनही रणजीतसिंहांचे काम केलेले नसल्याचं सांगितलं जात आहे. रामराजेंनी मोहिते पाटील यांनी छुप्या पद्धतीने रसद पुरवल्याचं बोललं जात आहे. तर निंबाळकर यांचं या भागात वरदहस्त असल्याने त्यांनी 2019 मध्ये रामराजेंच्या विरोधानंतरही फलटणमधून रणजीतसिंहांनी मोठं मताधिक्य मिळविले होते. आता रामराजेंनी विरोध केला तरी म्हणावा तसा फरक पडणार नाही, असं सांगितलं जात आहे.