Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या याचिकवेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आज सुनावणी पार पाडली. या सुनावणीदरम्यान, खासदार निलेश लंके यांना न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. या खटल्याची पुढील सुनावणी येत्या 2 सप्टेंबरला पार पडणार असून न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठासमोर हा खटला सुरु आहे.
आमदार अपात्रेतचं भिजत घोंगडं; सुप्रीम कोर्टाकडून दोन आठवड्यांची मुदतवाढ
अहमदनगर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून सुजय विखे तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके मैदानात होते. लंके आणि विखे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या निवडणुकीत निलेश लंके यांनी अवघ्या काही मतांनी सुजय विखे यांचा पराभव केला. या पराभवानंतर सुजय विखे यांनी नगर दक्षिण मतदारसंघातील 30 ते 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन आणि व्हिव्हीपॅट पडताळणीची मागणी केली. या मागणीनंतर सुजय विखे यांनी पडताळणीचे शुल्कही निवडणूक आयोगाकडे भरले.
‘तुम्ही माझ्यावर दबाव टाकू नका’; जरांगे पाटलांची भेट घेतल्यावर भूमिका स्पष्ट करणार -राज ठाकरे
निवडणूक आयोगाकडे पडताळणीची मागणी केल्यानंतर सुजय विखे यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतलीयं. निवडणूक काळात निलेश लंके यांनी निवडणूक खर्च प्रत्यक्षातील खर्च याचा ताळमेळ दिसून येत नसल्याचा दावा सुजय विखे यांच्याकडून करण्यात येत आहे. तसेच मुद्रित प्रचारातील साहित्यांचे खर्चही निलेश लंके यांनी दाखवलेले नाहीत. परिणामी लंकेंनी दाखवलेल्या खर्चात मर्यादेचे उल्लंघन झाले आहे. या अशा अनेक मुद्द्यांवरुन सुजय विखे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीयं.
आमदार अपात्रेतचं भिजत घोंगडं; सुप्रीम कोर्टाकडून दोन आठवड्यांची मुदतवाढ
दरम्यान, या संपूर्ण घडामोडीनंतर आता उच्च न्यायालायात सुनावणी सुरु झाली. या सुनावणीमध्ये खासदार निलेश लंके यांना उच्च न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे आता निलेश लंके यांना पुढील तारखेला न्यायालयात हजर रहावे लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी पुढील सुनावणीत काय होणार? याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय.