‘तुम्ही माझ्यावर दबाव टाकू नका’; जरांगे पाटलांची भेट घेतल्यावर भूमिका स्पष्ट करणार -राज ठाकरे
Raj Thackeray on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील जेव्हा मुंबईला निगाले होते तेव्हा मी सांगितले होतं मुख्यमंत्री तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील. काय झालं? मी जरांगे पाटील यांना फोन करणार आहे, त्यांची भेट घेणार आहे, असं राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना स्पष्ट केलं. यावेळी ( Maratha Reservation) मराठा आंदोलकांनी जरांगे मंगळवारी तुळजापूरला मुक्कामी असणार आहेत असे सांगितले. यावर राज ठाकरे यांनी जरांगे यांचा नंबर मागितला व त्यांच्याशी बोलतो असे आश्वासन दिले.
शेख हसीनांच्या राजवटीचा अंत! कोण आहे नाहिद इस्लाम?, बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाच चेहरा
ओबीसी बोलतात यातून माथी भडकविली जातील. यातून हाती काही लागणार नाही असं छगन भुजबळ बोलतात. मी जरांगेंशी बोलणार आहे. त्यावेळी त्यांना काय सांगायचं ते सांगणार आहे. मला जातपात कळत नाही. माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे. मला या गोष्टी जरांगेंशी बोलू द्या, तुम्ही माझ्यावर दबाव टाकू नका, राज ठाकरे म्हणाले. ते मराठा आंदोलकांशी बोलत होते.
राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी धाराशीवमधील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. यावेळी रात्री मराठा आंदोलक या हॉटेलमध्ये जमा झाले आणि त्यांनी मराठा आरक्षणावर तुमची भुमिका काय अशी विचारणा केली. राज ठाकरे यांनी सोलापूर येथे केलेल्या मराठा आरक्षण विषयी वक्तव्यावर मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली.
Video: बांगलादेशमध्ये हिसांचाराचं रौद्र रूप; आंदोलकांनी माजी कर्णधाराचं घर पेटवलं; व्हिडिओ व्हायरलं
यावेळी राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली. महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात आल्यानंतर कुठल्याही समाजाला आरक्षणाची गरज भासणार नाही, असं माझं मत असल्याचं राज म्हणाले. मराठा आरक्षणाविषयी माझी काय भूमिका आहे. हे मी तुम्हाला मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सांगेन, असं ठाकरे म्हणाले. तसंच जालन्याच्या दौऱ्यावेळी मी जरांगे यांची भेट घेईन असं आश्वासनही राज यांनी आंदोलकांना दिलं आहे.