Ashish Shelar Criticize Udhhav Thackeray on The Best Employees Co-operative Credit Society Elections : दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर झाला आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीत भाजपप्रणीत पॅनल आणि शशांक राव यांना मोठा विजय मिळाला आहे. त्यावरून मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजपासाठी मुंबईकरांचा शुभसंकेत! बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले. कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला आणि “पत” आणि “पेढी”साठी लढणाऱ्यांच्या हाती मोठा भोपळा दिला. मुंबईकर, कामगार, श्रमिक आमच्याबाजूने आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पक्ष म्हणून लढलो नाही पण आमचे प्रसाद लाड आणि शशांक राव विजयी झाले. हा तर मोठा शुभसंकेत!
भाजपासाठी मुंबईकरांचा शुभसंकेत !!
बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले.
कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला आणि "पत" आणि "पेढी"साठी लढणाऱ्यांच्या हाती मोठा भोपळा दिला.
मुंबईकर, कामगार, श्रमिक आमच्याबाजूने आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
पक्ष म्हणून लढलो…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 20, 2025
बॅलेट पेपरवर निवडणूका झाल्यावर हा विजय आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे तमाम तथाकथित राजकीय विश्लेषक, मतचोरी झाले. म्हणणारे तथाकथित तज्ञ आणि विश्वविख्यात प्रवक्त्यांपासून गल्लोगल्लीतल्या “निर्भय”वक्त्यांपर्यंत सगळे उघडे, नागडे झाले आहेत. भर पावसात तोंडावर आपटले आहेत. मुंबईकर ही आमचा आणि मुंबई ही आमची! असं म्हणत आशिष शेलार यांनी बेस्ट पतपेढी निवडणुकीवरून ठाकरेंना टोला लगावला आहे.
मुंबईतील भांडुप भागात विजेच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू; लोकांनी आवाज दिला पण…
तसेच ते पुढे म्हणाले की, आता भूमिका स्पष्ट झाली आहे. भाजप पक्ष म्हणून आम्ही या निवडणुकीत उतरलो नव्हतो. ही निवडणूक कामगारांची होती बेस्ट वर प्रेम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती. याच राजकीय करण उबाठा आणि मनसेने केले. प्रत्येक गोष्टीचा राजकीय करण करण याचाच फळ त्यांना मिळालं आणि हाती भोपळा आला. 0 + 0 हा शून्यच हे मी आधीही म्हणालो होतो. आज भोपळा हातात आला मुंबईचा विजय झाला मुंबईकरांचा विजय झाला मराठीचा विजय झाला कामगारांचा विजय झाला आणि भाजपचा विजय झाला.
पावसाचा कहर! वसई- विरार जलमय, 12 तास वीजपुरवठा खंडित; कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून मी आज जाहीर करतो की मुंबई महानगरपालिकेच्या स्टार प्रचारकांची मोठी यादी जाहीर होईलच पण स्टार प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव मी आज जाहीर करत आहे. या दोघांनीच बी एस टी ई च्या निवडणुकीत या दोन्ही भावांच्या पक्षाला मुंबईकरांचा आशीर्वाद कुठे आहे हे दाखवून दिले. शोलेत जसे होते तसे मुंबई भाजपच्या निवडणुकीत जय वीरूची जोडी म्हणून मी शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव घोषित करतो. मी या दोन्ही पक्षांना सांगतो. आधी या दोघांशी निपटा आणि मग माझ्याकडे आणि देवेंद्र फडणवीसानकडे या.
मुंबईकरांचा भाजपला शुभसंकेत तर ‘पत’ आणि ‘पेढी’ साठी लढणाऱ्यांना मोठा भोपळा
18 ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. काल मंगळवारी रात्री उशीरा या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला. यामध्ये ठाकरे बंधूंना मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत फारशा चर्चेत नसलेले शशांकराव पॅनेलने कमाल करुन दाखवली. बेस्ट पतपेढीच्या एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. यामध्ये शशांकराव पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले. तर, प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या ( महायुती ) सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले.