Download App

‘महादेवी’ हत्तीणीसाठी कोल्हापूरकर एकवटले, पदयात्रेत हजारोंचा सहभाग; खासदारांनीही दिली आनंदाची बातमी

आज लोकांनी नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालय पदयात्रा काढली. ही पदयात्रा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.

Mahadevi Elephant News : कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण वनताराकडे सुपूर्द (Mahadevi Elephant) करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतर ही कार्यवाही करण्यात आली. परंतु, या प्रकरणात आता नवीन माहिती हाती आली आहे. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी (Kolhapur News) स्वाक्षरी मोहीम सुरू केली. त्यानंतर आज लोकांनी नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालय पदयात्रा काढली. ही पदयात्रा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. याच दरम्यान आता खासदार धैर्यशील माने यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी आज कोल्हापुरकरांनी पदयात्रा काढली. या पदयात्रेत खासदार धैर्यशील माने, आमदार अशोक माने, माजी आमदार प्रकाश आवाडे यांना लोकांच्या संतापाचा सामना करावा लागला. पदयात्रेत सहभागी न होता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, खासदार माने यांनी मात्र यावेळी दिलासादायक बातमी दिली.

महादेवी हत्तीणीला परत आणणारच! कोल्हापुरात लोकप्रतिनिधींची स्वाक्षरी मोहीम; विरोधक-सत्ताधाऱ्यांची एकजूट

या पदयात्रेदरम्यान खासदार माने यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पेटाने वातारवण पेटू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. पेटाने घेतलेल्या भुमिकेमुळे संशय व्यक्त केला जात आहे. कारण या संस्थेने वनताराचे नाव सुचवले होते. पेटाने आता यांत्रिक हत्ती देतो असे म्हणत चेष्टा करू नये असा इशारा खासदार धैर्यशील माने यांनी पेटाला दिला.

हत्ती वनताराला पाठवणे म्हणजे षडयंत्र : राजू शेट्टी

नांदणी मठातील हत्ती वनताराला पाठवण्यात आला. या घडामोडींवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील संताप व्यक्त केला. पेटा संघटनेच्या तक्रारीवरुन महादेवी हत्तीला गुजरातच्या वनताराला पाठवण्यात आले. हा सर्व षडयंत्राचा भाग होता असा गंभीर आरोप शेट्टी यांनी यावेळी केला. आता पदयात्रा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देणार आहोत असे शेट्टी यांनी सांगितले.

प्रकरण काय?

मिरवणुकीसाठी वन विभागाकडून परवानगी न घेता महादेवी हत्तीणीचा वापर करण्यात आला असल्याचा आरोप ‘पेटा’ ने केला होता. हे प्रकरण न्यायालयात पोहचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने हत्तीणीची पाहणी करुन अहवाल सादर केला होता. या अहवालात प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य द्यावे लागेल असे निरीक्षण नोंदवलं होतं.

हसन मुश्रीफांच्या हातातच आता कोल्हापूरच्या चाव्या किरीट सोमय्या ते फडणवीस 

follow us