महादेवी हत्तीणीला परत आणणारच! कोल्हापुरात लोकप्रतिनिधींची स्वाक्षरी मोहीम; विरोधक-सत्ताधाऱ्यांची एकजूट

Mahadevi Elephant Kolhapur News : कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण वनताराकडे सुपूर्द (Mahadevi Elephent) करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतर ही कार्यवाही करण्यात आली. परंतु, या प्रकरणात आता नवीन माहिती हाती आली आहे. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी (Kolhapur News) स्वाक्षरी मोहीम सुरू केली. संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबवण्यात येत आहे. विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ही मोहीम सुरू केली आहे. तसेच खासदार धैर्यशील माने यांनीही याबाबतीत संसदेत आवाज उठवणाप असल्याचे म्हटले आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर हत्तीण वनताराला सुपूर्द करण्यात आली. तरीदेखील जनभावना पाहता या हत्तीणीला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दुसरीकडे नांदणीकरांसह शिरोळ तालुक्यात सुद्धा अंबानी यांची उत्पादने न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिओ सिम अन्य सिममध्ये पोर्ट करण्यात येत आहेत. इतकंच नाही तर कस्टमर केअरच्या अधिकाऱ्यांना फोन केले जात आहेत. अशा पद्धतीने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
नांदणी ग्रामस्थ भावूक, न्यायालयाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीणी वनताराकडे रवाना
आम्ही संसदेत आवाज उठवणार : माने
दरम्यान, या प्रकरणी खासदार धैर्यशील माने यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी आता संसदेत आवाज उठवणार आहोत. पेटा स्वतःला प्राणी मित्र म्हणवून घेत असेल तर आमच्याकडे गावागावात भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात आहेत. शहरापासून गावापर्यंत या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. ही भटकी कुत्री वनताराकडे सुपूर्द करण्यासाठी काय करता येते ते पाहा आम्हीही मदत करू अशा शब्दांत खासदार माने यांनी प्रतिक्रिया दिली.
प्रकरण काय?
मिरवणुकीसाठी वन विभागाकडून परवानगी न घेता महादेवी हत्तीणीचा वापर करण्यात आला असल्याचा आरोप ‘पेटा’ ने केला होता. हे प्रकरण न्यायालयात पोहचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने हत्तीणीची पाहणी करुन अहवाल सादर केला होता. या अहवालात प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य द्यावे लागेल असे निरीक्षण नोंदवलं होतं.
हत्तीणीला नांदणी मठातून हलवण्याची शेट्टीचीच मागणी; पत्र व्हायरल होताच राजू शेट्टींचा खुलासा