Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात पुन्हा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीवर चर्चा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत पुण्यातील कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. आधी बैठकीत प्रवेश नाकारल्याने तर आत सोडल्यावर बंद खोलीत बैठक का घेतली असा जाब विचारत गोंधळ झाल्याची माहिती आहे.
भाजी विक्रेत्याची इच्छा, राहुल गांधींनी थेट जेवायलाच बोलावलं; लंच डिप्लोमसीचा ‘असा’ही किस्सा!
स्वातंत्र्यदिनी कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी सातारा, पु्णे येथील कार्यकर्ते उशीरा पोहोचल्याने त्यांना पोलिसांनी रोखले. कार्यकर्त्यांनी त्यांना आत सोडण्याची विनंती केली. पण, पोलिसांनी त्याला नकार दिला. आत बसायला जागा नसल्याचे कारण दिले. त्यामुळे येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
पंधरा मिनिटांनंतर ही बैठक संपली. बैठक संपल्यानंतर पुण्यातील कार्यकर्ते आत आले आणि अजित पवार यांच्या समोरच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप केला. पण, एका कार्यकर्त्याने हातातील फाईल पवार यांच्यासमोरच टेबलावर आपटल्या. बंद खोलीत बैठक का घेताय असेही विचारले. यामुळे बैठकीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
नवाब मलिक कोणत्या गटात जाणार? भुजबळांच्या उत्तराने वाढला सस्पेन्स
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समोरच हा गोंधळ सुरू होता. कोल्हापुरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यात शाब्दिक वाद झाले. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापुरातील प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. यावेळी विविध शिष्टमंडळांनी भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली. यावेळी वाद झाला. सकल मराठा समाजाच्या बैठकीत सर्वांचं ऐकलं. इतर भागातील काही लोक आले होते. त्या शिष्टमंडळाचं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या समवेत म्हणणं ऐकून घेतलं. त्यावर मला काय वाटतं तेही सांगितलं, असे अजित पवार म्हणाले.