Sharad Pawar on Ajit Pawar : अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कामाला लागले आहेत. शरद पवार यांनी साताऱ्यापासून पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार म्हणजे पक्ष नाही असा थेट इशारा दिला आहे. आम्ही कोणावरही कारवाई करणार नाही, कोणालाही अपात्र करणार नाही. मी त्या रस्ताने जाणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबतही जाऊ शकतो असे विधान अजित पवार यांनी केले होते. यावर शरद पवार म्हणाले की आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो. शिवसेनेसोबत अडीच वर्षे काम केले आहे. त्यावेळी शिवसेनेसोबत गेलो म्हणून चूक झाली असे आम्हाला वाटले नाही. देशात आणीबाणी लागू झाली, त्यावेळी देशातल्या अनेक राजकीय पक्षांनी इंदिरा गांधींवर टीका केली होती. त्यावेळी इंदिरा गांधींची भूमिका योग्य आहे अशी भूमिका घेणारा एकच पक्ष आणि एकच नेता होता ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि पक्षाचे नाव शिवसेना. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने एकही उमेदवार उभा केला नव्हता आणि इंदिरा काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता, असे शरद पवार यांनी सांगितेल.
जयंत पाटलांनी अजित पवारांच्या विकेट काढल्या; सरचिटणीस, जिल्हाध्यक्षांची केली हकालपट्टी!
त्यामुळे 2019 ला आम्ही काही वेगळे करतोय असे वाटले नव्हते. यापूर्वी आम्ही त्यांच्यासोबत भूमिका घेतली होती. काही घडतंय हे आज त्यांना कळतंय. पण अडीच वर्षापूर्वी आम्ही सरकार स्थापन केले. त्यावेळी काल ज्यांनी शपथ घेतली त्यांनीही शपथ घेतली होती. त्यावेळी काही कोणाला चिंता वाटली नाही. त्यामुळे आज काय म्हणतात त्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
नऊ मंत्र्यावरील कारवाईचे शरद पवारांकडून समर्थन, ‘जयंत पाटलांना निर्णय घेण्याचा अधिकार’
ज्या प्रवृत्तीशी आमचा संघर्ष आहे, त्यांच्याबरोबर काही लोक गेल्याने नवीन पिढीच्या कार्यकर्ता नाउमेद होऊ नये, तो जोमाने उभा राहिला पाहिजे, या अपेक्षेने मी हा दौरा सुरु केला आहे. दौरा सुरु केल्यापासून तरुण कार्यकर्ते पाठिंबा देत आहेत. या तरुणांना योग्य दिशा आणि कार्यक्रम दिला की संपूर्ण महाराष्ट्रातील चित्र राष्ट्रवादीला अनुकूल होईल. याची सुरुवात साताऱ्यातून झाली, असे शरद पवार यांनी सांगितले.