नऊ मंत्र्यावरील कारवाईचे शरद पवारांकडून समर्थन, ‘जयंत पाटलांना निर्णय घेण्याचा अधिकार’
Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्ही कोणतीही कायदेशीर लढाई लढणार नाही, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ असे सांगितले पण जयंत पाटील यांच्याकडून विधीमंडळातील कारवाईसाठी अर्ज केले आहेत. यावर शरद पवार म्हणाले की महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील यांच्याकडे नेतृत्व आहे. जयंत पाटील पक्षाचे जसे अध्यक्ष आहे तसे विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी एखादा निर्णय घेतला असेल तर हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काय केलं हे मला माहिती नाही. त्यांनी जो निर्णय घेतला असेल तो विचारपूर्वक घेतला असेल, असे म्हणत शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या कारवाईचे समर्थन केले.
उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर अजित पवार म्हणाले की पक्ष माझ्यासोबत आहे, वरिष्ठांचा मला आशीर्वाद आहे. अजित पवार यांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले की आम्ही कोणावर अपात्रेची कारवाई वगैर या गोष्टीमध्ये आम्ही जाणार नाही. पक्षाच्या बांधणीसाठी मी जाहीरपणे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहे. त्यामुळे आशीर्वाद हा प्रश्नच येत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
अजित पवारांच्या बंडावर सुजय विखेंनी सावध भूमिका म्हणाले यामुळे राज्यात…
ज्या प्रवृत्तीशी आमचा संघर्ष आहे, त्यांच्याबरोबर काही लोक गेल्याने नवीन पिढीच्या कार्यकर्ता नाउमेद होऊ नये, तो जोमाने उभा राहिला पाहिजे, या अपेक्षेने मी हा दौरा सुरु केला आहे. दौरा सुरु केल्यापासून तरुण कार्यकर्ते पाठिंबा देत आहेत. या तरुणांना योग्य दिशा आणि कार्यक्रम दिला की संपूर्ण महाराष्ट्रातील चित्र राष्ट्रवादीला अनुकूल होईल. याची सुरुवात साताऱ्यातून झाली, असे शरद पवार यांनी सांगितले.
अजितदादांचा प्रदेशाध्यक्ष ठरला! थोड्याच वेळात होणार घोषणा…
काल अजित पवार यांच्यासोबत असलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे आणि त्यामध्ये शरद पवार यांचा फोटो वापरला आहे. यावर शरद पवार म्हणाले की अजित पवार काही परके नाहीत. सुप्रिया सुळे तीन दिवस त्यांच्यासोबत होत्या. याचा अर्थ काही चुकीचे केले नाही. शेवटी एकत्र काम केलेले आहे. मतभिन्नता असते. ती मतभिन्नता एखाद्या सहकाऱ्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे संशय व्यक्त केला पाहिजे असं नाही.