अजितदादांचा प्रदेशाध्यक्ष ठरला! थोड्याच वेळात होणार घोषणा…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही घोषणा केलीय. आज सकाळीच अजित पवारांच्या ‘देवगिरी’ बंगल्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची बैठक झाली. या बैठकीत सुनिल तटकरे यांची अजित पवार गटाची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. यासंदर्भात अद्याप अजित पवारांकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.
दिग्गजांचं बंड, नवख्यांना हाताशी धरत पवारांचा शड्डू; NCPच्या नव्या फळीतील यंग ब्रिग्रेड चर्चेत…
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आपल्यासोबत 32 आमदार सोबत घेत राजभवनात दाखल झाले होते. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यापाल रमेश बैस यांच्यासमोर पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याचवेळी अजित पवार गटाच्या 9 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
शिंदेंचे मुख्यमंत्रीपद धोक्यात? अजितदादांना भाजपचा शब्द; पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याने खळबळ
अखेर अजित पवारांच्या या कृतीला शरद पवारांनी आपला पाठिंबा नसल्याचं जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे घडलेल्या बंडाविरोधात दंड थोपटत पक्षात नव्या तरुणांची फळी तयार करण्यासाठी राज्यभर दौरा करीत आहेत. अशातच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून अजित पवारांसोबत शपथविधी घेतलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केलीय. या संपूर्ण घडामोडींनतर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्हावर दावा केलाय. या दाव्यानंतर आता प्रदेशाध्यपदाचीही ते लवकरच घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवारांनी केली होती निवड :
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवारांनी सुनिल तटकरेंची पक्षाच्या राष्ट्रीय खजिनदारपदी निवड करण्यात आली होती. स्वत: शरद पवारांनी तटकरे यांची नियुक्ती केली होती. याचवेळी शरद पवारांनी पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी खासदार प्रफुल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली. शिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांची राष्ट्रीय खजिनदार पदी नियुक्ती जाहीर केली होती.