दिग्गजांचं बंड, नवख्यांना हाताशी धरत पवारांचा शड्डू; NCPच्या नव्या फळीतील यंग ब्रिगेड चर्चेत…

दिग्गजांचं बंड, नवख्यांना हाताशी धरत पवारांचा शड्डू; NCPच्या नव्या फळीतील यंग ब्रिगेड चर्चेत…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी बंड केल्यानंतर आता शरद पवारांनी स्वत: दंड थोपटत रस्त्यावर उतरले आहेत. विरोधकांशी लढण्यासाठी पक्षात असलेल्या नवख्या तरुणांना संधी देत असल्याचं दिसून येत आहेत. शरद पवार आज कराडमधील माजी मुख्यमंत्री य़शवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी प्रतिक पाटील, रोहित पाटील यांच्यासह आमदार रोहित पवारांनी तळच ठोकलं आहे. (Sharad pawar holding hands with newcomers ncps new young brigade in discussion)

Ahmednagar Crime : आमदार राजळे अॅक्टिव्ह तरुणींच्या छेडछाडी विरोधात थेट गृहमंत्र्यांना घातलं साकडं

शरद पवारांसाठी मुंबईत जयंत पाटील तग धरुन आहेत तर दुसरीकडे राज्यभर दौऱ्यासाठी निघालेले शरद पवारांसाठी राष्ट्रवादीची यंग ब्रिगेड सज्ज झालीय. रोहित पवार, रोहित पाटील, आणि प्रतिक पाटील हे आपण शेवटपर्यंत शरद पवारांच्याच सोबत राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केलीय.

Box Collection: वीकेंडला ‘सत्यप्रेम की कथा’ची छप्परफाड कमाई! बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहिलंत?

कराडमध्ये शरद पवारांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. त्याचवेळी शरद पवारांसाठी मैदानात उतरलेली यंग ब्रिगेडने भूमिका स्पष्ट केलीय. आपली निष्ठा ही शरद पवारांच्याच चरणी असल्याचं रोहित पवारांनी ठामपणे सांगितलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पु्न्हा सर्वसामान्यांच्या ताकदीवर उभारी घेईल. आम्ही पवार साहेबांच्या सोबत आहोत. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच आम्ही याठिकाणी आलो असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं.

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांचं प्रमोशन, विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती

राजकीय भूकंपानंतर शरद पवार यांचे हात पुन्हा एकदा बळकट करण्यासाठी जयंत पाटील मुंबईत तळ ठोकून बसलेत तर राष्ट्रवादीची यंग ब्रिगेडही कराडमध्ये पवारांसाठीच हजर झाल्याचे दिसून आलयं. आता पुतण्यानेच राजकीय भूकंप घडवून आणणल्याने शरद पवारांचे आश्वासक चेहरे म्हणून आता रोहित पाटील, प्रतिक पाटील, यांच्यासह रोहित पवारही असल्याचं दिसून येत आहे.

‘संजय राऊतांवर बोलणं म्हणजे मोठा शाप’; सदाभाऊंचा राऊतांना खोचक टोला

दरम्यान, अजित पवारांच्या बंडांनतर रोहित पवारांनीही आपली भावनिक प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, काँग्रेससोबतही असा प्रयोग होऊ शकतो, आमचं मत वाया गेलंय असं सर्वसामान्य मतदारांना वाटतं असल्याने राजकारण येऊन चूक केली की काय असं वाटत आहे. मात्र, काहीही झालं तरीही आम्ही शरद पवारांच्याच मागे उभे असल्याचं रोहित पवार यांनी ठणकावून सांगितलं आहे.

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी राज्यभर दौरा सुरु केला आहे. पवारांकडून राज्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुन्हा एकदा पक्षबांधणी सुरु असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यादरम्यान, शरद पवारांकडून राष्ट्रवादीची यंग ब्रिगेड उभी केली जात आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शऱद पवार नव्या उमेदीने उभं राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube