Download App

जरांगेच्या सभेला शाहू महाराज, संभाजीराजेंची हजेरी; लोकांचे रक्त पिऊन श्रीमंत..; शाहू महाराजांसमोरच भुजबळांचा समाचार

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा समाज आंदोलन करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगेंनी यांनी पुन्हा एकदा राज्याचे दौरे सुरू केले. त्यांची आज कोल्हापुरात सभा झाली. या सभेला संभाजीराजे येणार नसल्याची चर्चा होती. मात्र, शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhaji Raje Chhatrapati) जरांगेच्या सभेला हजेरी लावली.

एमपी-छत्तीसगडमध्ये विधानसभेसाठी मतदान; भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस 

जरांगे पाटील राज्यभर मोर्चे काढत आहेत. साखळी आंदोलन करत आहेत. त्यांनी राज्यात सभाही घ्यायला सुरूवात केली. त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी होत आहे. जरांगे पाटील यांची आज ऐतिहासिक दसरा चौकात जाहीर सभा झाली. या सभेला लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हजर होते. या सभेला छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. मात्र, संभाजीराजे या सभेला येणार नाहीत, असं बोलल्या जातं होतं. मात्र, असं होणार नाही. संभाजीराजेंवर आमचा हक्क आहे. ते आमच्या पाठिशी आहेत, अशी प्रतिक्रिया जरांगेंनी दिली होती. आणि आज संभाजीराजेंनी या सभेला हजेरी लावली. यातून संभाजीराजेंचा जरांगेंना पाठिंबा असल्याचं दिसून येत.

नेहरूंच्या एका निर्णयाने बीसीसीआय वाचली, भारतीय क्रिकेटचा रंजक प्रवास 

दरम्यान, छगन भुजबळ हे मनोज जरांगे आणि मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्राविरोधात आक्रमक झाले आहेत. ओबीसी एल्गार सभेत भुजबळांनी जरांगेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली. त्यामुळे छगन भुजबळ यांच्यावर टीका सुरू झाली आहे. संभाजीराजेंनीही भुजबळांवर टीका केली आहे. त्यांनी एक ट्वीट करत भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत असल्याचे म्हटले आहे. यावरून जरांगेना संभाजीराजेंचा पाठिंबा असल्याचं दिसतं.

काय म्हणाले मनोज जरांगे?
कोल्हापूरच्या सभेत बोलतांना जरांगे म्हणाले की, आम्हाला आरक्षण देऊन न्याय द्या. 1805 ते 1967 पर्यंतचे सर्व पुरावे तपासण्यास सुरुवात केली. गावागावात पुरावे मिळू लागले आहेत. हे पुरावे का लपविले गेले, याचं उत्तर द्यावं. समित्या नेमल्या त्या वेळी पुरावे नसल्याने आरक्षण देता येणार नाही, असे सांगिलत्या जायचं. आता पुरावे सापडत आहेत. याचा अर्थ पुरावे लपवण्यात आले होते. समित्यांवर इतका दबाव होता का? पुरावे होते, तेव्हाच आरक्षण दिलं असतं तर मराठा जगाच्या पाठींवर प्रगत जात राहिली असती, असं जरांगे म्हणाले.

यावेळी त्यांनी भुजबळांवरही टीका केली. मराठा समाजाला आरक्षण मिळू लागल्यानं भुजबळांचा तिळपापड झाा. पण, माझ्या जातीच्या आड कोणी येत असेल तर त्याला सोडणार नाही. लोकांचे रक्त पिऊन श्रीमंत झाले म्हणून तुम्हाला तुरूंगात जावं लागलं. मुख्यमंत्री होणं, हा त्यांचा छुपा अजेंडा आहे. ते मुख्यमंत्री झाले तर आमचे आरक्षण गेलेचं म्हणून समजा, अशी भीती जरांगेंनी व्यक्त केली.

Tags

follow us