Download App

बाजार समिती निवडणूक; ढाकणे-राजळे गटांत शाब्दिक चकमक

पाथर्डी बाजार समितीसाठी आज मतदान पार पडत असून मतदान केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर आमदार राजळे आणि राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची घटना घडलीय. ढाकणे आणि राजळे समर्थकांमध्ये मतदाराच्या प्रवेशद्वारावरुनच मतभेद निर्माण होऊन वाद झाला आहे. पाथर्डी बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी 37 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

Mauritius दौऱ्यात फडणवीसांचे नव्या स्टाईलचे जॅकेट

या निवडणुकीत भाजपच्या आमदार मोनिका राजळे आणि प्रताप ढाकणे यांच्या पॅनलमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचं बोललं जातंय. आमदार मोनिका राजळे प्रणित आदिनाथ शेतकरी मंडळ व प्रताप ढाकणे प्रणित जगदंबा महाविकास आघाडीमध्ये लढत होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी अहमदनगर शहरातील आनंद शाळा येथे असलेल्या मतदान केंद्रावर भाजपने मतदारांना बसमधून आणल्यामुळे महाविकास आघाडीने त्याला विरोध केल्याचं पाहायला मिळालंय.

Brijbhushan Singh : नीरज चोप्रा, कपिल देवही कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ मैदानात; कुस्तीपटूंच्या आंदोलनाला क्रीडाविश्वातून पाठिंबा वाढला

मतदान केंद्रासमोर झालेल्या वादानंतर दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर यावेळी भाजप व महाविकास आघाडीने आपणच विजयी होणार असल्याचा विश्वास पत्रकारांसमोर व्यक्त केला.

मतदानासाठी प्रत्येक पक्षाने आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तयारी केली आहे. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवले आहेत. तर काहीजण दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात आणले आहेत.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी अजित पवारांचं शिंदे सरकारला पत्र

अनेक ठिकाणी मात्र बाजार समित्यांमध्ये ऐनकेन प्रकारे आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं त्यासाठी कट्टर विरोधकही एकत्र येताना पाहायला मिळाले आहे.

दरम्यान, पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ९६.७६ टक्के मतदान पाडलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून राजळे आणि ढाकणे समर्थकांमध्ये किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडलं आहे.

Tags

follow us