Mephedrone drug : चार महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसी आणि चंद्रमौली सहकारी औद्योगिक वसाहत येथे काही कारवाईत मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन या घातक अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर उत्पादन आणि विक्री करणाऱ्या टोळीच्या प्रमुखासह दोघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत या टोळीतील एकूण 13 जणांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये चिंचोळी एमआयडीसी आणि चंद्रमौली औद्योगिक वसाहतीमधील काही बंद औषध कारखान्यांमध्ये मेफेड्रॉन (एमडी) हे औषध तयार होत असताना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली होती.
त्यानंतर नाशिक पोलिसांनीही दोनदा छापे टाकून कोट्यवधी रुपयांचा मेफेड्रॉन आणि कच्चा माल जप्त केला.या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनीही सतर्कता दाखवत सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील देवडी फाट्याजवळ एक मोटार पकडली आणि त्यातून सुमारे 6 कोटी रुपये किमतीचा 3010 किलो मेफेड्रॉन जप्त केला. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली.
कांदा निर्यातबंदी कायम! शेतकरी आक्रमक, बाजार समितीच्या आवारात निषेध आंदोलन !
अधिक तपासात चंद्रमौली औद्योगिक वसाहतीमध्ये मेफेड्रॉन हे औषध तयार होत असल्याचे समोर आले होते. त्यातून तेथेही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये त्याचे धागेदोरे सापडले. या प्रकरणी आतापर्यंत 12 जणांना वेगवेगळ्या राज्यातून अटक करण्यात आली आहे.
मात्र या टोळीतील मुख्य म्होरक्याचा शोध लागू शकला नव्हता. जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूरज निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कर्नाटकातील कलबुर्गी येथे सापळा रचला.
पुणे लोकसभा : वडगाव शेरीची ताकद मुळीक यांच्यासाठी बूस्टर ठरणार
यामध्ये फैयाज अहमद रसूल शेख (वय 52, रा. स्वीट सहारा अपार्टमेंट, जीजी कॉलेज रोड, वसई, जिल्हा पालघर) याला अटक करण्यात आली. त्याचा दुसरा साथीदार रमेश नरसिंह ऐथा (वय 42, रा. मलकाजगिरी, हैदराबाद) याला हैदराबाद येथून अटक करण्यात आली.
या टोळीचा मुख्य सूत्रधार फैयाज शेख हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, चेन्नई, पालघर, नाशिक आदी ठिकाणी 10 गुन्हे दाखल असल्याचे पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी सांगितले. शेख यांचे शिक्षण इयत्ता दुसरीपर्यंतच झाले आहे. पण मेफेड्रॉन अंमली पदार्थ बनवण्याचं तांत्रिक ज्ञान त्याच्याकडे असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पुण्यातही टोळी सापडली
एकीकडे मेफेड्रॉनची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या फैय्याज शेखची टोळी सोलापुरात सापडली, तर दुसरीकडे नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील कुरकुंभमध्ये मेफेड्रॉनची निर्मिती करणाऱ्या टोळ्या सापडल्या आहेत. त्यांच्याकडून 1688 किलो मेफेड्रॉन अंदाजे 3276 कोटी रुपये किंमत आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
बारस्कर हा सरकारचा ट्रॅप, तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा डाव, जरांगेंचा पलटवार
यामध्ये वैभव उर्फ पिंटया भारत माने (सोमवार पेठ), अजय आमरनाथ करोसिया (भवानीपेठ), हैदर नुर शेख (विश्रांतवाडी), भिमाजी परशुराम साबळे (पुणे), युवराज बब्रुवान भुजबळ (डोबिंवली, मुंबई), दिवेश चिरंजीत भुटिया (नवी दिल्ली), संदिप राजपाल कुमार (नवी दिल्ली), संदिप हनुमानसिंग यादव (नवी दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.
पवारांचा शेवटचा डाव तुम्हाला चितपट करेल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला इशारा