Download App

आघाड्यांचे राजकारण फार काळ चालत नाही, मंत्री विखेंचे विरोधकांवर जोरदार टीकास्त्र…

Ahmednagar Political News : आघाड्याचे राजकारण फार काळ चालत नाही, त्यामुळे देशात कितीही पक्षांनी एकत्रित येऊन आघाडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तरी यशस्वी होणार नाही, नसल्याची जोरदार टीका महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी विरोधकांवर केली आहे. तसेच देशातही तसा प्रयत्न होत असला तरी त्याला यश येणार नाही. विरोधकांच्या वज्रमूठीला केव्हाच तडे गेले आहे. देशातील जनतेच्या मनात पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करण्यात निर्धार कायम असल्याचा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

मराठवाडा-विदर्भात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ 24 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पुर्ण झाल्‍याबद्दल भारतीय जनता पक्षाच्‍यावतीने महा जनसंपर्क अभियान आयोजित करण्यात आले आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात सात्रळ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधून योजनेची माहिती दिली. यावेळी खा.डॉ सुजय विखे पाटील, जिल्हा बॅकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले, विश्वासराव कडू यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

‘मी अदिती तटकरेंपेक्षा चांगलच काम करेन, महिला-पुरुषांत फरक असतोच ना’; गोगावलेंचं वादग्रस्त वक्तव्य

यावेळी बोलताना मंत्री विखे म्हणाले यांनी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यासंदर्भात उध्‍दव ठाकरे यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍यावर नाराजी व्यक्त केली आहे. राजकारणावर टीका केली जाते परंतू टीका करण्‍याची पातळी उध्‍दव ठाकरे यांनी सोडली. अडीच वर्ष महाविकास आघाडीचे नेतृत्व त्यांनी केले हा महाराष्ट्राला कलंकच होता, असा थेट आरोप त्यांनी केला. आघाड्यांचे राजकारण फार काळ चालत नाही हे राज्याने अनुभवले आहे, देशातही तसा प्रयत्न होत असला तरी त्याला यश येणार नाही. विरोधकांच्या वज्रमूठीला केव्हाच तडे गेले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

कुनो राष्ट्रीय उद्यानातून आणखी एका चित्ताचा मृत्यू, आतापर्यंतची सातवी दूर्घटना

केवळ व्यक्ती द्वेषापोटी मोदींवर टिका करण्‍याचे काम सुरु आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात जावून देशाच्‍या लोकशाही व्‍यवस्‍थेवर टिका करतात परंतू त्‍यांना निवडणूकीत जनाधार मिळत नाही. विरोधी पक्षनेतेपद मिळण्‍याचे संख्‍याबळही या पक्षाकडे आता राहिलेले नाही. परंतू या विरोधकांना जनतेच्‍या मनात कोणतेही स्‍थान नाही.

विखे पाटील म्‍हणाले. केंद्र सरकारच्‍या योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्‍य सरकार करत आहे. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली डबल इंजिनच्‍या सरकारला आता उपमुख्‍यमंत्री अजित पवारांच्‍या माध्‍यमातून तिसरेही इंजिन जोडले गेल्‍याने हे सरकार आता वेगान पुढे जात असून, गतीमानतेने निर्णयांची अंमलबजावणी होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली सरकारने ९ वर्षात केलेली कामगि‍री ही संपूर्ण जगासमोर आहे. आज वेगाने वाढणारी अर्थव्‍यवस्‍था म्‍हणून भारत देशाकडे पाहीले जात आहे. कोरोनाच्या संकटातही आत्‍मनिर्भर पॅकेजच्‍या माध्‍यमातून या देशातील जनतेला केंद्र सरकारने आधार दिला. आज समाजातील सर्वच घटकांना विविध योजनांच्‍या माध्‍यमातून विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचे काम मोदींच्या नेतृत्‍वाखाली होत आहे. सेवा, सुशासन आणि गरीब कल्‍याणाचा मार्ग मोदी यांनी सर्वांना दाखवून दिला, असल्याचं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us