मराठवाडा-विदर्भात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ 24 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मराठवाडा-विदर्भात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ 24 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) उशिरा दाखल झाला असला, तरी अल्पावधीतच पावसाने सरासरी गाठली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आता महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणात रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला होता. मात्र आता कोकणात पावसाचा जोर कमी होणार असून मुंबई, पुणे, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Heavy rains will increase in Marathwada Vidarbha 24 districts are warned of heavy rains)

यंदा राज्यात मान्सूनचं आगमनं उशीरानं झालं. त्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसला. विदर्भासह राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांना दुबार पेरण्याची वेळ आली आहे. दरम्यान, आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत मुंबई, राजगड, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होईल. तर याच वेळी हवामान विभागाने राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर आता कोकणात पाऊस थांबला आहे. त्यामुळे तापमानात वाढ जाणवत आहे तर मुंबईत आठवड्याची सुरुवात उकाड्याने झाल्याची भावना मुंबईकरांनी व्यक्त केली.

अनेक ठिकाणी उकाड्यात वाढ
या आठवड्यात मुंबईत फारसा पाऊस न पडल्याने उकाड्याचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र ही उष्णता जास्त नसेल, असा अंदाज आहे. ठाणे जिल्ह्यातही पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत दक्षिण कोकणातील विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा हंगाम संमिश्र राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस?
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मात्र, आता हवामान खात्याने नाशिक, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना यासह विर्भातील बुलढाणा, वाशीम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया गडचिरोली, चंद्रपूर आणि अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली. हवामान विभागाने यादरम्यान वादळी वारेही वाहतील असं सांगितलं.

मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 13 जुलैनंतर ही स्थिती सुधारू शकते. तोपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी उच्च तापमानाचा चटका जाणवण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube