Shambhuraj Desai : अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये दाखल झाल्यापासून शिंदे गटाची अस्वस्थता वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची धोक्यात असल्याच्या बातम्या येतच असतात. तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदार मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. आमदारांनी ही नाराजीही बोलून दाखवली आहे. हे कमी म्हणून की काय आता राज्यात ज्या ठिकाणी शिंदे गटाचं प्राबल्य आहे तेथे अजित पवार गटाकडून राजकीय अतिक्रमण केले जात असल्याचे बोलले जात आहे.
या चर्चांवर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणानंतर देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिंदे गटाची सत्ता असलेल्या जिल्ह्यात अजित पवारांचे दौरे वाढले आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देसाई यांनी पत्रकारांनाच प्रश्न विचारला. कोणत्या जिल्ह्यात दौरे वाढलेत? सातारा जिल्ह्यात दौरे वाढलेत का?
Independence Day 2023: लालकिल्ल्यावरील सुंदर दृश्य पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुलून जाईल
अजित पवार काल साताऱ्यावरूनच कोल्हापुरला गेले. मात्र साताऱ्यात आलेच नाहीत. याच मार्गाने ते कोल्हापुरला गेले. साताऱ्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांची वाट पाहत होतो. उपमुख्यमंत्री झाल्यावर अजित पवार हे पहिल्यांदाच साताऱ्यात येत आहेत म्हणून मी स्वागतासाठी वाट पाहत होतो. त्यांच्या स्वागतासाठी बुकेही घेऊन ठेवला होता. मी जिल्हाधिकाऱ्यांनाही विचारत होतो की अजितदादा कधी येणार? पण, अजितदादा काही आलेच नाहीत असे देसाई म्हणाले.
तुम्ही म्हणताय तसं कोणाचंच कोणावर अतिक्रमण नाही. आम्ही तिघे सुखी आहोत. आमचा संसार चांगला चालला आहे. आम्ही तिघेही एकविचाराने काम करतोय. कोणाचच कोणावर अतिक्रमण नाही. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठीच आम्ही काम करत आहोत असेही मंत्री देसाई म्हणाले.
चोरडियांच्याच घरी शरद पवारांची भेट का घेतली? अजितदादांनी सत्य सांगूनच टाकलं