Download App

सरकारला ‘गतिमान’ म्हणावं तरी कसं?, आमदार तनपुरेंची खोचक टीका…

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असून लोकप्रतिनिधी आपापल्या मतदार संघातील प्रश्न मांडत आहेत. यासोबतच या अधिवेशनात सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याचाही विरोधकांचा प्रयत्न आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या आमदार प्राजक्त तनपुरे (MLA Prajakt Tanpure) यांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. गेल्या वर्षभरापासून राजकीय अस्थिरतेमुळे राज्यातील जनतेची कामे खोळंबळी आहेत. शेतकरी, मजूर, विद्यार्थी या सर्वांनाच हालअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे या सरकारला ‘गतिमान’ म्हणावं तरी कसं हा प्रश्न आहे, अशी जोरदार टीका आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी केली आहे. (MLA Prajakt Tanpure critisize shinde fadanvis pawar in vidhansabha)

प्राजक्त तनपुरे काय म्हणाले?
विधानसभेत बोलतांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून तनपुरे चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून असलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे राज्यातील जनतेची कामे खोळंबली आहेत. शेतकरी, मजूर, विद्यार्थी या सर्वांनाच हालअपेष्ठा सहन कराव्या लागल्या आहेत. शेतकरीही हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना दिवसा विज मिळत नाही. त्यांना दिवसाही वीज मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘Sa Re Ga Ma Pa’चं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ ठिकाणी होणार ऑडिशन 

मुख्यमंत्री सौर कृषी योजनेंतर्गत महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली कामे आता अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. ट्रान्सफॉर्मर जळाल्यावर तो तातडीने मिळावा, या दृष्टीने अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. परंतु परिस्थिती पाहता या योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या सरकारला ‘गतिमान’ म्हणावं तरी कसं हा प्रश्न आहे, अशी खोचक टीप्पणीही त्यांनी केली.

उर्जा विभागांतर्गत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसीएफ निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. शेतकऱ्यांचा वीजप्रश्न सोडवण्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा हा निधी अचानक बंद करण्यात आला. त्याचं कारणं काय ह्याचा खुलासा मंत्री महोदयांनी त्यांच्या उत्तरात द्यावा, तर या प्रस्तावाचे चीज झाले, असं आम्ही समजू.

दोन लाखांवरील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा, प्रधानमंत्री किसान योजना सपशेल फसली आहे. माझ्या मतदारसंघात ५० टक्क्यांहून अधिक शेतकरी यापासून वंचित आहेत. वेगवेगळे निकष लावून दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही दुधाला अत्यंत कमी भाव मिळत आहे. सर्वच बाबींवर सकारात्मक प्रतिक्रिया मिळण्याची आम्हाला मंत्री महोदयांकडून अपेक्षा असल्याचं तनपुरे म्हणाले.

Tags

follow us