‘Sa Re Ga Ma Pa’चं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ ठिकाणी होणार ऑडिशन

‘Sa Re Ga Ma Pa’चं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ ठिकाणी होणार ऑडिशन

Sa Re Ga Ma Pa: ‘सा रे ग म प’चं (Sa Re Ga Ma Pa) नवीन पर्व लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. येत्या ९ ऑगस्टपासून हा कार्यक्रम सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसापासून या कार्यक्रमाचा प्रोमो (Promo) सोशल मीडियावर (Social media) प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानंतर आता या कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला लवकरच सुरुवात होणार असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)


येत्या २९ जुलैला ‘सा रे ग म प २०२३’ चे पहिले ऑडिशन (audition) होणार असल्याची माहिती मिळाली आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून ‘झी टीव्ही’ (Zee TV) वाहिनीने चाहत्यांसाठी अंताक्षरी, सा रे ग म प, डान्स इंडिया डान्स आणि इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ यासारखे हटके कार्यक्रम करत असताना दिसून येत आहे. गेल्यावर्षी ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या उदंड यशानंतर आता लवकरच ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ हा कार्यक्रम सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे.

याद्वारे देशात होतकरु गायकांना जनतेसमोर आपल्या गायनकलेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.‘सा रे ग म प २०२३’साठी शनिवार २९ जुलै रोजी मुंबई शहरात प्रत्यक्ष ऑडिशन्सला सुरुवात होईल. जर तुम्ही १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे असाल, तर तुम्हाला ही संधी उपलब्ध होणार आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये गुवाहाटी, कोलकाता, बंगळुरू, लखनौ, चंदिगड, जयपूर, दिल्ली आणि वडोदरा या शहरांमध्ये ऑडिशन्स घेतले जाणार आहे.

Abhimaan: पहिले लग्न अन् मग सेलिब्रेशन; ‘अभिमान’ च्या आठवणींना बीग-बी, जया बच्चनकडून उजाळा

मुंबईतील प्रत्यक्ष स्थळांवर ऑडिशन्स घेणार असल्याचे सांगितले आहे. तेव्हा तुम्हाला जर असे वाटत असेल की तुमचा आवाज मस्त असेल आणि तो जगापुढे सादर केला पाहिजे, तर तुम्हाला लवकरच मुबंईत येऊन ऑडिशन्समध्ये सहभागी व्हावे लागणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube