Abhimaan: पहिले लग्न अन् मग सेलिब्रेशन; ‘अभिमान’ च्या आठवणींना बीग-बी, जया बच्चनकडून उजाळा

Abhimaan: पहिले लग्न अन् मग सेलिब्रेशन; ‘अभिमान’ च्या आठवणींना बीग-बी, जया बच्चनकडून उजाळा

Abhiman Movie: ‘अभिमान’ हिंदी चित्रपटसृष्टीतील (Abhiman Hindi Movie) एक क्लासिकल फिल्म ठरली होती. ऋषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee) यांचं दिग्दर्शन, बिग बी अमिताभ बच्चन– जया बच्चन यांची सुपरहीट जोडी, हटके कथानक, सुंदर गाणी, लक्षवेधी संवाद या सगळ्याच गोष्टीमुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 27 जुलै 1973 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने जाणून घेणार आहोत, या चित्रपटाविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी….

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)


भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अभिमान या चित्रपटाचा महत्त्वाचा वाटा आहे. लक्षवेधी कथानक ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. लेखक आणि फिल्ममेकर नबेंदु घोष यांची पटकथा या चित्रपटाला लाभली. राजेंद्र बेदी यांनी या चित्रपटाचे संवाद लिहीले होते. चित्रपटाची कथा आणि संवादांसह चित्रपटाची गाणीही लोकप्रिय ठरली. सचिन देव बर्मन यांचं संगीत आणि मजरुह सुल्तानपुरी यांचे गीत असलेल्या गाण्यांनीही लक्ष वेधून घेतले आहे.

“तेरी बिंदिया रे, लुटे कोई मन का नगर, तेरे-मेरे मिलन की ये रैना, मीत ना मिला रे मन का, नदिया किनारे, पिया बिना, अब तो है तुमसे ही सगळीच गाणी लोकप्रिय ठरली होती आणि आजही तितकीच श्रवणीय आहेत. या चित्रपटात सुबीर आणि उमा या पात्रांची कहाणी आहे. आपल्या पत्नीला गायन क्षेत्रात आणळ्यानंतर तिला आपल्यापेक्षा जास्त मिळणारं यश पाहून पतीची झालेली घालमेल आणि त्यांचं नातेसंबंध यावर हा चित्रपट बेतलेला आहे. असं म्हटलं जातं की या चित्रपटाची कथा ही किशोर कुमार आणि त्यांची पत्नी रुमा घोष यांच्या आयुष्यापासून प्रेरित आहे, तर संगीतकार रवीशंकर आणि पत्नी अन्नपूर्णा यांच्यापासून प्रेरित असल्याचही म्हटलं जातं. यावर मात्र कोणताही शिक्कामोर्तब आजवर झालेला नाही.

अमिताभ आणि जया भादुरी यांचा जंजीर हा चित्रपट सुपरहीट ठरला होता. एकीकडे दोघांचे प्रेम चर्चेत होतं तर दुसरीकडे दोघांचे चित्रपटही लोकप्रिय ठरत होते. यातच अभिमान चित्रपट प्रदर्शित होण्याआधी अमिताभ आणि जया यांनी लग्न केलं होतं. जंजीर चित्रपटाच्या यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी अमिताभ हे जया यांच्यासोबत लंडनला जाणार होते. मात्र हरिवंशराय बच्चन यांनी लग्नाशिवाय एकत्र जाण्यास नकार दिल्याचं बोललं जातं. आणि म्हणूनच अमिताभ – जया यांनी आधी लग्न केलं मग ते फिरण्यासाठी लंडनला गेले होते. 3 जून रोजी त्यांनी लग्न केलं होतं आणि त्यानंतर 27 जुलै रोजी अभिमान प्रदर्शित झाला आणि ही जोडी ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिनही लोकप्रिय ठरली.

अमिताभ आणि जया बच्चन हे अभिमान चित्रपटाच्या निर्मात्यापैकी एक होते. या चित्रपटासाठी सादरकर्ते म्हणून अमिया असं लिहीलं जातं ज्यात अमिताभ यांचं अमि आणि जया यांच्या नावातलं या म्हणून अमिया म्हणजेच दोघांनी या चित्रपटासाठी स्वत: निर्मिती देखील केली होती.या चित्रपटातून अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. दोघांच्या भूमिका आणि त्यांचं सहज काम लक्ष वेधून घेणारं ठरलं. या चित्रपटासाठी जया बच्चन यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीची फिल्मफेयर पुरस्कारही मिळाला होता.

d-tweet-about-bra-panties-goes-viral-fans-have-hilarious-reactions-72422.html

अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासह या चित्रपटातील इतर भूमिकाही लोकप्रिय़ ठरल्या. विशेषकरून अभिनेत्री बिंदू यांच्या करियरसाठी हा चित्रपट महत्त्वाचा ठरला. त्यांनी आधी केलेल्या कामापेक्षा काहीतरी वेगळं या चित्रपटात केलं. बिंदू यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती जी सुबीर यांची मैत्रीण असते मात्र सुमीरवर प्रेम करते. या भूमिकेतून बिंदू यांच्या कामाचही कौतुक झालं होतं.जेव्हा या चित्रपटाची सुरुवात झाली तेव्हा राग रागिनी असं नाव ठेवण्याचं ठरलं होतं. मात्र जसं जसं या चित्रपटाचं चित्रीकरण होऊ लागलं तसं या चित्रपटाचं नाव अभिमान ठेवण्याचं ठरवलं गेलं. याच नावाने हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. आजही अभिमानची लोकप्रियता कायम आहे आणि वर्षोनूवर्षे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून राहील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube