पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवारांची धडपड, प्रविण दरेकरांची टीका…

राष्ट्रवादीचं अस्तित्व टिकवण्यासाठीच शरद पवारांची धडपड सुरु असल्याची टीका भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे. दरेकर अहमदनगर दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमानिमित्त शेवगाव तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जपानमध्ये आभाळ फाटलं! 15 ठिकाणी भूस्खलन, 20 नद्यांना महापूर…#JapanRain #Rainnews #japanlandslide https://t.co/ryCMz9CYLc — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 9, 2023 दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर […]

'बावनकुळेंना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न'; विरोधकांच्या टीकेवर दरेकर सरसावले

Pravin Darekar

राष्ट्रवादीचं अस्तित्व टिकवण्यासाठीच शरद पवारांची धडपड सुरु असल्याची टीका भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे. दरेकर अहमदनगर दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमानिमित्त शेवगाव तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांचा राज्यभर दौरा सुरु आहे. काल शरद पवार यांनी नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. त्यानंतर प्रविण दरेकर यांनी शरद पवारांवर टीका केलीय. यावेळी बोलताना आमदार दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या संवाद यात्रेवर बोट ठेवत शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ठाकरे उद्धव ठाकरेंचे आमदार फुटले तेव्हा त्यांनी संवाद यात्रा काढली होती.

तोंडामध्ये अंजीर अन् हातात खंजीर ही माणसं बेभरवशाची; अजितदादांसमोर शिंदेंची टोलेबाजी

उद्धव ठाकरेंच्या संवाद यात्रेला काय प्रतिसाद मिळाला हे सर्वांनी पाहिलं असून आता शरद पवारांची पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी धरपड सुरु असल्याचं ते म्हणालेत. तसेच शरद पवार यांना या वयात नेतृत्वासाठी आणि आपल्या अट्टहासासाठी वणवण फिरायला लावत असल्याची टीकाही त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता केलीय.

राज्यात सध्या राजकीय भूकंप घडल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्यभर दौरा करुन संघटनेची बांधणी करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आपला महाराष्ट्र दौरा आजपासून सुरु केला आहे. दोन्ही पक्षातील ज्या नेत्यांनी शिंदे गटासह भाजपशी हातमिळवणी केलीय त्यांच्याविरोधात शड्डू ठोकण्यात येत असल्याचं या दौऱ्यावरुन दिसून येत आहे.

Exit mobile version