तोंडामध्ये अंजीर अन् हातात खंजीर ही माणसं बेभरवशाची; अजितदादांसमोर शिंदेंची टोलेबाजी

तोंडामध्ये अंजीर अन् हातात खंजीर ही माणसं बेभरवशाची; अजितदादांसमोर शिंदेंची टोलेबाजी

CM Ekanth Shinde with DCM Ajit Pawar :  राज्य शासनाचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज गडचिरोली येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नवीनच सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अजित पवार यांची ही पहिलीच वेळ होती. या कार्यक्रमात  लाभार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात जोरदार टोलेबाजी केली.

शिंदे म्हणाले की, “तोंडामध्ये अंजीर आणि हातात खंजीर ठेवून बोलणारी माणसं ही बेभरवशाची  असतात, हे दादांना कळलं. घरी बसून काम करणाऱ्यांपेक्षा सर्व सामान्य लोकांच्या दारी जाऊन काम करणाऱ्यांसोबत आपण जायला पाहिजे, विकासाला साथ दिली पाहिजे हेही दादांना पटलं आणि म्हणून दादा सोबत आले.  दादा चिंता करू नका तुमचं नाव अजित आहे. तुम्ही करताय त्या लढाईमध्ये  आम्हीदेखील आपल्या सोबत आहोत आणि अजित म्हणजे जीत देखील आपली पक्की आहे”.

‘पांडुरंगाच्या दारात सांगतो, भुजबळांचा पराभव करणारच’ राऊतांचं थेट चॅलेंज!

तसेच गेले दोन दिवस तुम्ही जे बोलत आहातं असं बोलत रहा. सगळ्यांना वस्तूस्थिती कळू द्या. सत्यता कळू द्या. तुम्ही जे बोलत राहिलात तर पुढे काय होईल त्या विचाराने अनेकांना घाम फुटलेला आहे. प्रफुल पटेल यांनी  सांगितलं एक पुस्तक लिहायचं त्यांनी ठरवलं आहे.  त्यामुळे सगळा इतिहास हा लोकांना कळू द्या, जनतेला कळू द्या, कारण मी देखील त्याच्यातूनच गेलेलो आहे, असे शिंदे म्हणाले.

‘अजितदादांच्या एन्ट्रीने बनला विकासाचा ‘त्रिशूळ’; शिंदेंसमोरच फडणवीसांची जोरदार बॅटिंग

दरम्यान, शासन आपल्या दारी या कार्यक्रमाल उपस्थित राहण्याची अजित पवारांची ही पहिलीच वेळ होती. या अगोदर अजितदादांनी विरोधी पक्षनेता म्हणून या कार्यक्रमावर टीका केली होती. परंतु आता त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून हा कार्यक्रमाला उपस्थित रहावे लागले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube