‘पांडुरंगाच्या दारात सांगतो, भुजबळांचा पराभव करणारच’ राऊतांचं थेट चॅलेंज!

‘पांडुरंगाच्या दारात सांगतो, भुजबळांचा पराभव करणारच’ राऊतांचं थेट चॅलेंज!

Sanjay Raut challenges Chagan Bhujbal : राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या बंडानंतर फुटलेल्या पक्षाची घडी बसविण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू होत असून पहिलीच सभा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या येवला मतदारसंघात होत आहे. अशा प्रकारची रणनिती आखून शरद पवार यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. त्यांना ठाकरे गटाचीही साथ मिळाली असून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भुजळांना ललकारले आहे.

‘मी पांडुरंगाच्या दारात सांगतो. येवल्याचा पुढील आमदार हा शिवसेनेचा असेल. भुजबळ विधानसभेत नसतील. आम्ही मुंबईत त्यांचा पराभव घडवून दाखवला आहे. नाशिकला लोकसभेत त्यांचा पराभव केला आहे. आता येवल्यात करू’, असे आव्हान राऊत यांनी छगन भुजबळ यांना दिले.

‘राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येतील का?’ संजय राऊतांच्या तोंडीही नरमाईचे बोल..

खासदार राऊत आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंढरपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘शरद पवार यांच्या राजकारणामुळेच अजित पवार इथपर्यंत पोहोचले आहेत. शरद पवार हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे योद्धे आहेत. आता आम्ही येवल्यात भुजबळ यांचा पराभव करून दाखवणार आहोत.’

मी बाजूला होतो, 40 आमदार परत येणार का ?

‘घटनात्मक संस्था भाजपाच्या गुलाम झाल्या आहेत. आता लोकांचा विश्वास फक्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर आहे. निवडणूक आयोगाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा नाही. मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे. मी बाजूला सरकतो. येणार आहेत का ४० आमदार परत?’, असा सवाल त्यांनी केला.

क्रांतिकारी निर्णयाच्या दिशेनं नार्वेकरांचं पाऊल; शिंदे-ठाकरेंच्या 55 आमदारांची धाकधूक वाढली

मिंधे गटाचे आमदार पैशाने विकले

‘एकनाथ शिंदेना काय नाही दिलं. मलाही पक्ष सोडता आला असता, मी तुरुंगात गेलो होतो. पण पक्षाने मला खूप दिले आहे. त्यामुळे बेईमानी करणं आमच्या रक्तात नाही. भाजपाच्या तंबूत जाऊन टिकणे सोपे नाही. शिवसेना २५ वर्ष राहिली आणि टिकली बाकीच्यांचे अवघड आहे. मला पक्षाने पाठवले म्हणून मी राज्यसभेवर जातोय. आमदारांनी एक उदाहरण दाखवावं की त्यांनी माझ्यामुळे बंड केलं. मिंधे गटाचे आमदार हे पैशाने विकले गेले आहेत’, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube