Ahmednagar Crime : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी वाढू लागली आहे. यातच जिल्ह्यातील तिसगाव तालुक्यामधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या भर चौकात एक तरुणीची टवाळखोराकडून छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे.
#तिसगाव तालुका पाथर्डी येथे शाळेत जाताना एका मुलीची छेड-छाडीची घटना घडल्याचे समजले. शाळेत जाणाऱ्या मुलींची छेड काढण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.अशा प्रकारच्या घटना घडणे हे अतिशय गंभीर असून मुलींची छेड काढणाऱ्या नराधमांना शासन हे झालेच पाहिजे. पोलिस प्रशासनास आदेश दिले असून अशा… https://t.co/5lRcfDATjM
— Monica Rajeev Rajale (@Rajale_Monica) July 3, 2023
वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने तरुणींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या टवाळखोरांना कठोर शासन व्हावे. तसेच असे प्रकार घडू नये यासाठी ठोस पाऊल उचलावी अशी मागणी भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ( BJP MLA Monika Rajale demand for strictly governd to who molestation of girls to HM Devendrs fadanvis)
आता मंत्रिपदाचं गाठोडं बांधा आणि टाका मंत्रालयाच्या माळ्यावर; अबांदास दानवेंचा शिंदे गटाला टोला
आमदार राजळे यांचे ट्विट :
तिसगाव तालुका पाथर्डी येथे शाळेत जाताना एका मुलीची छेड-छाडीची घटना घडल्याचे समजले. शाळेत जाणाऱ्या मुलींची छेड काढण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.अशा प्रकारच्या घटना घडणे हे अतिशय गंभीर असून मुलींची छेड काढणाऱ्या नराधमांना शासन हे झालेच पाहिजे. पोलिस प्रशासनास आदेश दिले असून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत या बाबत वेळीच पावले उचलेल जातील.शाळा, मुली व पालकांनी या बाबत जागरुक रहावे.मा. गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की या प्रकरणात लक्ष घालून गुन्हेगारांना कठोर शासन करावे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यातील तिसगावमध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहे. तिसगावमधील काही टवाळखोर तरुण बाहेर गावावरून येणाऱ्या मुलींची छेड काढण्याचे प्रकार करत असल्याने तिसगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारीदेखील हनुमान टाकळी येथील दोन मुलींची तिसगावच्या एका तरुणाने छेड काढल्याने तिसगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच तिसगावांमध्ये येऊन एका तरुणास अटक करून तिसगावमध्ये शांतता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.