आता मंत्रिपदाचं गाठोडं बांधा आणि टाका मंत्रालयाच्या माळ्यावर; अबांदास दानवेंचा शिंदे गटाला टोला

आता मंत्रिपदाचं गाठोडं बांधा आणि टाका मंत्रालयाच्या माळ्यावर; अबांदास दानवेंचा शिंदे गटाला टोला

Ambadas Denave : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) आज मोठा भूकंप झाला. अजित पवारांनी (Ajit Pawar) विधानसभएच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे ९ आमदार थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. या घडामोडींमुळं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची अपेक्षा असलेल्या शिंदे गटाच्या लोकांच्या आशेवर पाणी फिरलं. त्यावरून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Demave) यांनी शिंदे गटाला टाला लगावला. आता मंत्रीपदाची स्वप्ने गाठोड्यात बांधा आणि टाका मंत्रालयाच्या माळ्यवार असं टोला दानवेंनी लगावला. (Ajit Pawars Deputy Chief Ministers swearing by Ambadas Danave taunts Shinde group)

अंबादास दानवे यांनी ट्विट करत शिंदे गटावर निशाणा साधला. त्यांनी लिहिलं. घ्या! जे निधी देत ​​नाहीत अशी ओरड कर होते, आता तेच मांडीला मांडी लावून बसणार! आता कोणाला दोष देणार? असा सवाल त्यांनी केला. त्यांनी लिहिलं की, मला कीव येते त्या 40 जणांच्या गॅंगची. अगोदरच मंत्री होण्याहून लाथाळ्या होत्या, आता तर मंत्रिपदाची स्वप्ने गाठोड्यात बांधा आणि टाका मंत्रालयाच्या माळ्यावर! उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि काँग्रेस पक्ष हे आव्हान स्वीकारतील आणि महाराष्ट्राला पुन्हा प्रगतीच्या दिशेने घेऊन जातील. लढेंगे भी, जितेंगे भी! विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची भीती मिंधे गटापेक्षा भाजपला अधिक वाटते आहे. निकालाचा उलटफेर झाला तर सरकार वाचवण्यास केलेला हा खटाटोप आहे, असं दानवे म्हणाले.

दरम्यान, अजित पवार यांनी राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या तीन वर्षांत त्यांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर माध्यमांशी संवाद साधतांना शरद पवारांनी मी खंबीर आहे. लढायला मजुबत आहे, असं सांगत जे आमदार गेले आहे, त्यातील 80 टक्के आमदार संध्याकाळपर्यंत परत येतील, असा दावा केला. त्यामुळं आणखी राज्याच्या राजकारणात काय घडामोडी घडतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube