कोल्हापूर : कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची मोठी सभा झाली. त्यात राष्ट्रवादीचे राज्यातील नेतेही उपस्थित होते. स्थानिक नेत्यांनेही जोरदार भाषणे ठोकली आहे. शरद पवारांचे सभेला सभेला गर्दी झाली होती. गर्दीच्या लोकांचे नियंत्रण करण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांना सभेस्थळी येऊ दिले जात नव्हते, असा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) ट्वीट केला आहे. त्यावर रोहित पवारांनी काही संशय व्यक्त केला आहे.
काही नेत्यांनी विचारधारा बदलली तरी कार्यकर्ते मात्र आपल्या विचारांशी ठाम आहेत. याच कार्यकर्त्यांना सभेला जाण्यापासून रोखण्याचं काम पोलिसांकरवी केल्याचं कार्यकर्त्यांनी पाठवलेल्या या व्हिडिओतून दिसतंय. यात पोलिस कर्मचाऱ्यांची चूक नसेल पण त्यांना अधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरुन… pic.twitter.com/d9w2P7W39S
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 25, 2023
राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडून दोन गट झाले आहेत. शरद पवार गट व अजित पवार गटाने आता राज्यात सभा घेत आहे. शरद पवारांची बुधवारी कोल्हापुरात जंगी सभा आयोजित करण्यात आली होती. याबाबत रोहित पवारांनी ट्वीट म्हटले की, काही नेत्यांनी विचारधारा बदलली तरी कार्यकर्ते मात्र आपल्या विचारांशी ठाम आहेत. याच कार्यकर्त्यांना सभेला जाण्यापासून रोखण्याचे काम पोलिसांकरवी केल्याचं कार्यकर्त्यांनी पाठवलेल्या या व्हिडिओतून दिसतेय, असे रोहित पवार म्हणतात.
शरद पवारांनी महागाई, बेरोजगारीवरून केंद्राला फटकारले, कांद्यावरून एकनाथ शिंदेंना सुनावले !
या व्हिडिओबाबत रोहित पवारांनी पोलिस कर्मचाऱ्यांची बाजू घेतली आहे. यात पोलिस कर्मचाऱ्यांची चूक नसेल पण त्यांना अधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरुन आदेश दिले आहेत. हे पहावे लागेल, असे पवार म्हणत आहे. या सभेला जाण्यापासून कार्यकर्त्यांची कितीही अडवणूक केली तरी स्वाभिमान राखण्यासाठीची निर्धार सभा मात्र ठासूनच झाली, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.