Mla Shahajibapu patil on Sharad Pawar मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर 50 खोके घेतल्याचा आरोप विरोधक करत असतात. त्याला आता आमदारही चोख उत्तर देत असतात. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी 50 खोक्यांवरून विरोधकांचा जोरदार समाचार घेतलाय. कसले खोके घेतल्याचे सांगता. पाटलांची औलाद आहे. जातीवंत औलाद आहे. 175 खोक्यांची जमीन विस्काटून टाकली. पत्र्यावळ्यासारखी विस्काटून टाकली. 50 खोक्यांचे काय घेता, असे उत्तर शहाजीबापू पाटील यांनी दिले.
सांगोलीत आमदार आपल्या दारी या कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी शरद पवार यांच्यावर मोठा आरोप केलाय. पवार हे ज्येष्ठ नेते आहे. ते माझे 45 वर्षे पालक राहिले आहेत. पवारांचा राजकारणाचा संपूर्ण इतिहासाचा बाराकाव्याचा अभ्यास केला तर हा माणूस हा जवळ आलेल्यांना संपून टाकतो. अनेक आमदारांना दगा दिला आहे. जवळ गेले की चिरडून टाकतात. अनेक छोट्या पक्षाने पवारांना संपविले असल्याचा आरोपही शहाजीबापू यांनी केला आहे. शिवसेनाला पवार कधीच माफ करणार नाही. कारण शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी पवारांवर टीका केली आहे.
कर्नाटकच्या निवडणुकीत ‘शकुनी’ची एन्ट्री ! माजी मुख्यमंत्र्याच्या घरातच सुरू झाले महाभारत
तर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शहाजीबापू पाटील यांनी मोठा आरोप केला आहे. अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा एक प्लॅन होता. त्यांना शिवसेनेतील दहा ते पंधरा आमदारही निवडून येऊन द्यायचे नव्हते. त्यात माझ्यासह चाळीस आमदारांची यादी होती, असा आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.
Sanjay Raut : ”अजित पवार कोणाचे मांडलिक म्हणून काम करतील असे वाटत नाही”
50 खोके घेतल्याच्या आरोपावर शहाजीबापू म्हणाले, डाळिंब द्राक्षाचे खोके असतात. 50 खोके घेतल्याचे अजित पवार, उद्धव ठाकरे सांगतात. त्यांना सांगतो मी पाटलांची औलाद आहे. जातीवंत औलाद आहे. 175 खोक्याची जमिन पत्र्यावळे फेकतात तशी विकली आहे. तसे सातबारा उतारे फेकलेले आहेत. मी कर्णाची औलाद आहे. तुमच्यासारखे पैसे घरात घेऊन जात नाही. पैसे साठवून नातवांसाठी, पोरांसाठी ठेवा, असा टोलाही शहाजीबापू पाटील यांनी लगावला आहे.