Download App

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला 2 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने 19 वर्षीय तरुणाला 2 वर्ष सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अहमदनगरमधील शेंडी येथील रेहान उर्फ मोहम्मद अंजर रिजवान असं या आरोपीचं नाव असून जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर देशमुख यांनी शिक्षा ठोठावली आहे.

.. तरच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वागत करू; शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

पीडित मुलीला आरोपीने रस्त्यात अडवून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, माझ्यासोबत चल असं म्हणत तिला नातेवाईकाच्या घरी घेऊन गेला. त्याचं ठिकाणी आरोपीने विनयभंग केला असल्याचं पीडित मुलीने फिर्यादीत म्हटलंय.

सुरुवातीला पीडित मुलगी घरातून निघून गेल्याबाबत तिच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांच्या तपासानंतर पीडित मुलीचा शोध लागला. पीडित मुलगी सापडल्याने पोलिसांनी तिचा जबाब घेतला.

पुणे महापालिका आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना दणका; तब्बल 2300 जणांवर कारवाईचे आदेश

पीडित मुलीच्या जबाबानंतर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा संपूर्ण तपास पोलिस उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी यांनी केल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं.

दरम्यान, या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी, पीडित मुलीचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी , तसेच आलेला पुरावा ग्राहय धरून आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्ष सक्त मजूरी, 5 हजार दंड आणि 6 महिने साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील ॲड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले आहे.

Tags

follow us