नाशिक : नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आणखी एक धडाकेबाज कारवाई करत मोठा मासा गळाला लावला आहे. नाशिकचे तहसीलदार नरेश कुमार बहिरम (Naresh Kumar Bahiram) यांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. (Nashik tehsildar Naresh Kumar Bahiram caught while accepting bribe of 15 lakhs)
नरेश कुमार यांनी गौण खनिज प्रकरणात सव्वा कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी 15 लाख रुपयांची लाच मागितली होती. एकदा झालेला आदेश फेरतपासणीसाठी घेण्यासाठी मागणी करण्यात आली होती.
नाशिक तालुक्यातील राजूर बहुला येथील जमिनीवर मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी सुमारे एक कोटी रुपयांचा दंड जमीन मालकाला आकारण्यात आला. त्याविरुद्ध जमीन मालकाने थेट उपविभाग कार्यालयात अपील दाखल केलं होतं. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यासाठी तहसीलदार बहिरम यांना नियुक्त केलं. बहिरम हे चौकशीसाठी आले असता त्यांनी तक्रारदाराकडे पंधरा लाख रुपयांची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने ही बाब थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवली आणि बहिरम यांना लाच घेताना अटक करण्यात आली.
पनवेल-नांदेड ट्रेन प्रवाशांनी रोखली, झुरळांचा बंदोबस्त केला तरच ट्रेन पुढे जाऊ देणार
नाशिक तालुक्यातील राजूर बहुला येथील जमिनीत मुरमाचे उत्खनन केल्याप्रकरणी मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १ कोटी २५ लाख ६ हजार २२० रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश कार्यालयाकडून प्राप्त झाले. त्या आदेशाविरुद्ध जमीन मालकाने नाशिकच्या उपविभागीय कार्यालयात अपील दाखल केले. त्यानंतरहे प्रकरण फेर चौकशीसाठी तहसीलदार नरेश कुमार बहिरम यांच्याकडे पाठवले होते.
सदर जागेत उत्खनन केलेला मुरूम त्याच ठिकाणी वापरण्यात आल्याचे जमीन मालकाने सांगितले होते. जमीन मालकाने सांगितल्याप्रमाणे याची पडताळणी करण्यासाठी बहिरम यांनी जमीन मालकांना त्यांच्या मालकीच्या राजूर बहुला येथे जागेच्या पाहणीसाठी बोलावले. मात्र जमिनीचे मालक वृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिलेलं होतं. त्यामुळं तक्रारदार तहसीलदार यांच्या भेटीसाठी निरीक्षण स्थळी गेले. यावेळी तससीलदार बहिरम यांनी तक्रारदाराकडे तडजोडींती 15 लाख रुपयांची लाच मागितली होती. सदरील लाच मागणी केल्याचं पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचं तहसीलदारांनी मान्य केलं आहे. तसंच मागणी केलेली लाचेची रक्कम आज लाच स्वीकारली. म्हणून आरोपी लोकसेवक तहसीलदार नरेश बहिरम यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला.