Download App

उदयनराजेंचे नाव घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्याने अजित पवारांना भरला ‘दम’

Deepak Pawar On Ajit Pawar : अजितदादा (Ajit Pawar)तुम्ही सगळ्यांना पक्षात घ्या चालेल. मात्र साताऱ्याच्या (Satara) दोन्ही महाराजांना जर पुन्हा राष्ट्रवादीत (NCP)घेतले तर आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहणार नाही, असा इशारा दीपक पवारांनी (Deepak Pawar)विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिला आहे. दीपक पवारांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेद्रराजे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यातील मेढा येथे शेतकरी मेळावा (Farmers meeting)व पक्षप्रवेश कार्यक्रम (Party Entry Program)आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अमित कदम यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील(Makarand Patil), आमदार शशिकांत शिंदे(Shashikant Shinde), राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने (Sunil Mane) आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक : राहुल गांधी प्रकरणावरुन मांडणार… 

यावेळी दीपक पवारांनी अमित कदम यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये स्वागत केले. ते म्हणाले की, या तालुक्यामध्ये शरद पवार यांच्या आशीर्वादाने इतका मोठा सहकार दिला. प्रतापगड सहकारी साखर कारखाना प्रामुख्याने शरद पवार यांच्या आशीर्वादाने दिला. तो कारखाना सहा वर्ष बंद पाडला. मार्केट कमिटी बंद अवस्थेत, खरेदी विक्री संघ बंद, कशीतरी जावली बॅंक तगतीय तीपण आता चोरांच्या हातात आहे. आणि तीथले चोर काय म्हणतात की, तुम्ही बंद संस्थेमध्ये इलेक्शन लावलं? त्यावर दीपर पवार म्हणाले की, अरे चोरांनो तुम्ही ती संस्था बंद केली, ती चालू करण्यासाठी आम्ही इलेक्शन लावलं आहे. त्यावर ते म्हणतात की, आम्ही ती संस्था बंद पाडू, आम्ही ती संस्था विकू पण तुम्ही त्या तालुक्यात निवडणूक लावायची नाही, असा पायंडा तालुक्यात सुरु असल्याची टीका दीपक पवारांनी केली आहे.

तुम्ही या तालुक्याच्या आमदारावर भरभरुन प्रेम केलं. सत्तेवर असताना कोट्यावधी रुपये दिले. पण ते माध्यमांना सांगायचे की, मी माझा पाठपुरावा केला. त्यासाठी अजित पवारांकडून निधी आणला. हा माझा वाटा आहे. असं ते सांगायचे मग आम्ही काय दाढ्या करायच्या का? असं म्हणाल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ते म्हणाले की, तालुक्यातील परिस्थिती तुम्हाला सांगणं गरजेचं आहे.

दीपक पवार म्हणाले की, मी जेव्हा आमदारकीला उभा राहिलो त्यावेळी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे सगळे राष्ट्रवादीचे सदस्य भाजपच्या स्टेजवर पाहायला मिळाले. त्यावेळी असणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना म्हटलं की, नोटीसा त्यांना द्या, त्यानिमित्तानं ते सगळे घरी बसतील पण कोणी काही ऐकलं नाही, कोणी काही बोललं नाही. त्या निवडणुकीत 78 हजार 600 मतं मी घेतली आणि 18 ते 20 हजार मतांनी मी पडलो. जर त्याचवेळी ही लोकं घरी बसली असती तर आज तुम्हाला या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार दिसला असता. पण आपण कुठंही दहशत दाखवत नाहीत, त्यामुळं अनेक जण सदस्य आहेत राष्ट्रवादीचे आणि वाड्यावर आहेत भाजपच्या अशी परिस्थिती झाली आहे. हे कसलं राजकारण म्हणायचं. त्यामुळं त्यांना पक्षातून हाकलून द्या, असं जाहीर करा अशी मागणी यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी केली आहे.

पवार म्हणाले की, आम्ही अमित कदम, आमदार शशिकांत शिंदे एकत्र आहोत, असंही यावेळी त्यांनी सांगितलं. आमच्यात भांडणं लावायचा प्रयत्न करु नका, असंही यावेळी म्हणाले. ते म्हणाले की, असेच आमच्या तालुक्यात येत जा, लोक तुमचे चाहते आहेत. मीही तुमचा चाहता आहे, पण तसा माझ्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद जास्त आहे. लवकरच अजित पवारांचाही आशीर्वाद मिळेल, असेही ते म्हणाले. त्याचवेळी पुन्हा एकदा अमित कदम यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. त्यानंतर आपण पुढचा राष्ट्रवादीचा आमदार कसा होईल यासाठी प्रयत्न करुया असंही ते म्हणाले. शेवटी जाता जाता ते म्हणाले की, वसंतराव मानकुंबरेला राष्ट्रवादीत घ्या, रांजणेंना राष्ट्रवादीत घ्या, जो येईल त्याला राष्ट्रवादीत घ्या पण दोन महाराज राष्ट्रवादीत घेतले तर मी राष्ट्रवादीत राहणार नाही, एवढं मात्र सांगतो, असा सज्जड दम राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी सांगितलं आहे.

Tags

follow us