राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदी योगिता राजळे…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षपद अनेक दिवसांपासून रिक्त होते. या पदावर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य योगिता शिवशंकर राजळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी आज प्रसिद्ध केले. ED Raid : पुणे, अहमदनगरमध्ये व्हीआयपीएस कंपनीवर ईडीची छापेमारी !, 18 कोटींवर टाच योगिता राजळे या पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या […]

Rajale

Rajale

राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षपद अनेक दिवसांपासून रिक्त होते. या पदावर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य योगिता शिवशंकर राजळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी आज प्रसिद्ध केले.

ED Raid : पुणे, अहमदनगरमध्ये व्हीआयपीएस कंपनीवर ईडीची छापेमारी !, 18 कोटींवर टाच

योगिता राजळे या पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या महिला नेत्या समजल्या जातात. जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष मंजूषा गुंड या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष होत्या. त्यांनी वैयक्तिक कारणास्तव 14 सप्टेंबर 2022ला महिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त होते.

“आज जे अनुभवलं ते विलक्षण” : राज यांची स्तुतीसुमने; फडणवीस-ठाकरे सूर पुन्हा जुळले?

या पदासाठी अनेक नावे समोर आली होती. मात्र राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी राजळे यांच्या नावाला सहमती दर्शविल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन कार्यक्रम अहमदनगर शहरातील रेल्वे पुलाजवळ असलेल्या मैदानात शुक्रवारी (ता. 9) होणार आहे. या पूर्वी महिला जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version