दंगलप्रकरणी नऊ आरोपींना अटक ; गावात दुसऱ्या दिवशीही बंदोबस्त

Ahmednagar: नगरपासून जवळ असलेल्या जेऊर गावात देवी बायजामाता उत्सवादरम्यान रविवारी रात्री दंगल झाली. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे. या सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. तर आणखी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. दुसऱ्या दिवशी गावात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची […]

Jauer

Jauer

Ahmednagar: नगरपासून जवळ असलेल्या जेऊर गावात देवी बायजामाता उत्सवादरम्यान रविवारी रात्री दंगल झाली. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे. या सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. तर आणखी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. दुसऱ्या दिवशी गावात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली आहे.

राम शिंदे-रोहित पवारांना संचालक फुटण्याची भिती; सभापतीपदाची तारीख ठरली

बायजामाता यात्रा उत्सवाच्या शेवटच्या दिवशी दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीत खेळणी दुकानदार, महिला व काही ग्रामस्थ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये इद्रीस मुनीर शेख, मन्नू अलीम कुरेशी, अजिज रफीक शेख, हर्षद बागवान, साहिल बागवान, मुनीर खैरू शेख, युनूस शेख, मुसा शेख, फइस रफिक शेख, अतुल उर्फ सोमनाथ सुखदेव तवले, सुनील दारकुंडे, गणेश दारकुंडे, दीपक शिंदे यांच्यासह इतर शंभर ते दीडशे लोकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. यातील नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला 20 वर्षांची शिक्षा…


रहाटगाडग्याजवळ पाळण्यामध्ये बसण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. त्यातील एका गटाने दगडे उचलून इतर मुलांच्या पाठीमागे पळाले. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही बाजूने दगडफेक सुरू झाली. त्यात पोलिसांनी दगड मारून धक्काबुक्की करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
जेऊर गावात घडलेल्या प्रकारानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते.

Exit mobile version