राम शिंदे-रोहित पवारांना संचालक फुटण्याची भिती; सभापतीपदाची तारीख ठरली

राम शिंदे-रोहित पवारांना संचालक फुटण्याची भिती; सभापतीपदाची तारीख ठरली

Rohit Pawar Vs Ram Shinde : कर्जत, जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या जोरदार राजकारण पेटले होते. पण मतदारांनी एकाच्या बाजूने कौल दिला नाही. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी नऊ असे समसमान संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे राजकारणात आणखी रंगत आली आहे. कोणत्या गटाचे सभापती-उपसभापती होणार याबाबत उत्सुकता लागली आहे. आता जामखेड बाजार समितीच्या सभापती-उपसभापती निवडण्याची तारीख जाहीर झाली आहे. या ठिकाणी 16 मे रोजी दोन्ही पदाची निवड होणार आहे.

शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपचे आमदार रडत होते…अजितदादांनी सांगितला ‘तो’ किस्सा

जामखेड बाजार समिती आपल्या ताब्यात येण्यासाठी दोन्ही आमदारांनी चंग बांधला आहे. त्यामुळे संचालक फुटू नये म्हणून दोन्ही आमदारांनी विशेष काळजी घेतली आहे. पवार व शिंदे गटाचे संचालक हे बाहेरगावी सहलीला गेले आहेत. निवडणूक झाल्यापासून हे संचालक हे बाहेरगावी आहेत. मुंबई, पुणे येथे हे संचालक ठेवले असल्याची चर्चा आहे.

40 टक्क्यांवरुन शरद पवारांनी हाणला डाव, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अखेर बोललेच

या दोन्ही ठिकाणी भाजपचे सभापती होतील, असा दावा खासदार सुजय विखे यांनी केला होता. त्यामुळे रोहित पवार गटाकडूनही संचालक सांभाळण्याबाबत विशेष काळजी घेतली जात आहे.

दोन्ही गटाकडे सम-समान जागा असल्यास ईश्वर चिठ्ठीद्वारे सभापती निवडला जातो. कर्जत-जामखेड बाजार समितीत अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे दोन्ही गटाला संचालक फुटण्याची भिती आहे.

दरम्यान, आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या गटाकडून सभापतिपदासाठी सुधीर राळेभात हे नाव निश्चित समजले जाते. तर उपसभापती पदासाठी कैलास वराट सर नावाची चर्चा आहे. आमदार प्रा. राम शिंदे गटातर्फे सभापतिपदासाठी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, माजी सभापती गौतम उतेकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर उपसभापती पदासाठी सचिन घुमरे यांच्या नावाची चर्चा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube