Download App

नितेश राणे येणार आता अडचणीत ? अॅट्रासिटीचा दाखल करण्याची मागणी

  • Written By: Last Updated:

नगरमधील कापड बाजारात काही व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्याचे पडसाद जोरदार उमटले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या जखमींची विचारपूस केली होती. राणे यांनी पोलीस, महानगरपालिका प्रशासनावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी राणे यांनी महापालिका आयुक्तांना शिवी हासडली होती.

Atiq Ahmed : अतिक अहमद ज्या खुनाच्या खटल्यात पहिल्यांदाच तुरुंगात गेला, तो खटला नेमका काय होता?

आयुक्तांना मस्ती आली काय असे शब्द राणे यांनी वापरले होते. त्याचे पडसाद महापालिकेत उमटले. आता राणेंविरोधात तक्रार अर्ज देऊन त्यांच्याविरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.

Mahesh Tapase : संजय राठोडांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरण आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्या

महापालिका कर्मचारी कृती समितीने कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना एक निवेदन देण्यात आले आहे. आयुक्त पंकज जावळे हे मागासवर्गीय असल्याचे राणे यांना माहीत आहे. त्यामुळेच राणे यांनी जावळे यांना टार्गेट केले आहे. त्यामुळे राणे यांच्याविरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी कृती समितीचे अनिल शेकटकर, भगवान जगताप, कांतीलाल जावळे, विनोद घोरपडे, गणेश शेकटकर, गणेश पठारे, सुनिता चव्हाण, लखन गाडे, शरद भालेराव उपस्थित होते.

Tags

follow us