Download App

Nitesh Rane: नगरच्या आयुक्तांना मस्ती आली काय ? म्हणत राणेंची जीभ घसरली !

  • Written By: Last Updated:

Nitesh Rane: नगरमधील कापड बाजारातील व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्याचे पडसाद आता उमटे लागले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जखमींची आज भेट घेतली. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. राणे यांची बोलताना मात्र जीभ घसरली आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांना बोलताना मस्ती आली काय असे म्हणत असताना राणे यांनी आयुक्तांना शिवीगाळ केली आहे.


भाजप नेत्यांचे अहमदनगरवर लक्ष, आ. नितेश राणे यांनी घेतली जखमी नितीन चिपाडे यांची भेट

राणे म्हणाले, नगरमधील परिस्थिती वाईट होत आहे. व्यापाऱ्यांना टार्गेट केले जात आहे. दंगल, मारहाण केली जात आहे. बाहेरून येऊन अतिक्रमण करता. व्यापाऱ्यांचे हक्काचे दुकाने आहेत. आम्ही अतिक्रमण करत नाही.

राम शिंदेंनी विखेंना आणले टेन्शन; नगरमधून लोकसभा लढण्याची तयारी

कायदा सुव्यवस्थेवरून पोलिसांवर राणे यांनी आरोप केले आहेत. राणे म्हणाले, कायदा सुव्यवस्था राखणे पोलिसांचे कर्तव्य आहे. ते आपले कर्तव्य बजावत नाहीत. तुम्हालाही मस्ती आली आहे का ?, तुमच्या ड्युट्या कोण वाचवतो तेच बघतो. पोलिसांनी दुकाने चेक करावीत.

हे भाजपचे सरकार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत. हसन मुश्रीफ पालकमंत्री नाहीत. हे सर्वांनी लक्षात घ्यावे. येथील आयुक्त अतिक्रमण काढत नाही. काढले तर दुसऱ्या दिवशी पुन्हा अतिक्रमण होते, असे म्हणत असताना राणे यांची आयुक्तांवर बोलताना जीप घसरली आहे. राणेंनी शिवी देत मस्ती आली का, असे म्हटले आहे.

Tags

follow us