भाजप नेत्यांचे अहमदनगरवर लक्ष, आ. नितेश राणे यांनी घेतली जखमी नितीन चिपाडे यांची भेट

भाजप नेत्यांचे अहमदनगरवर लक्ष, आ. नितेश राणे यांनी घेतली जखमी नितीन चिपाडे यांची भेट

MLA Nitesh Rane met the injured Nitin Chipade : अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये नितीन चिपाडे (Nitin Chipade या कांदा व्यापाऱ्याला किरकोळ कारणावरून जबर मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत नितीन चिपाडे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) हे आज नगरला आले असता त्यांनी यावेळी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी नितीन चिपाडे यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह अहमदनगरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये कमालीचा वाढ झाली आहे. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अहमदगनरमध्ये एका आठवड्याता दोन हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी दोन व्यापाऱ्यांवर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. हे दोघेही व्यापारी या हल्ल्यात गंभीर जखमी झालेत. तर त्याच्या एक दिवस आधी म्हणजे, 13 एप्रिल रोजी कांदा व्यापारी नितीन चिपाडे यांना किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली होती. शहरातीप मार्केट यार्ड परिसरात चिपाडे यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला होता. तीन ते चार जणांनी चिपाडे यांना मारहाण केली होती. त्यामुळं नगरमधील गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अजितदादा राऊतांवर का चिडले ? ; शिरसाटांनी सांगितलं नेमकं कारण..

दरम्यान, आता नगरबाहेरील नेत्यांचही नगरच्या गुन्हेगारीनं लक्ष वेधलं आहे. चिपाडे यांना जबर मारहाण झाल्यानं आमदार नितेश राणे हे आज नगरला आले असता त्यांनी यावेळी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी नितीन चिपाडे यांची भेट घेतली. चिपाडे यांच्याशी राणे यांनी संवाद साधला. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी नितेश राणे यांनी चिपाडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची देखील विचारपूस केली आहे. यावेळी राणे यांनी हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन दिलं.

नितीन चिपाडे यांनी 2018-19 मध्ये अशोक देसरडा यांना स्टेट बॅंकेतून 55 लाखांचे कर्ज घेऊन दिले होते. या कर्जाचे हप्ते देसरडा यांनी न भरल्याने बॅंकेने चिपाडे यांनी कर्ज भरण्यास सांगितले. त्यामुळं चिपाडे हे देसरडा यांच्या पलक एजन्सीमध्ये गेले होते. त्यावेळेस तेथे उपस्थित असलेल्या दोघांनी चिपाडे यांनी कशासाठी आले, असं विचारलं होते. त्यानंतर चिपाडे यांनी सांगितले की, कर्जाची रक्कम भरऊून घेण्यासाठी आल्याचं सांगितलं. त्यानंतर उपस्थित असलेल्या लोकांनी चिपाडे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चिपाडे यांना मारहाण केलेले हल्लेखोर सध्या मोकाट फिरत असून त्यांचावर पोलिसांनी कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळं चिपाडे आणि त्यांच्या कुंटुंबाला धोका असल्याचं बोलल्या जातं आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube