अजितदादा राऊतांवर का चिडले ? ; शिरसाटांनी सांगितलं नेमकं कारण..

अजितदादा राऊतांवर का चिडले ? ; शिरसाटांनी सांगितलं नेमकं कारण..

Sanjay Shirsat News : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भारतीय जनता पार्टीत जाणार असल्याच्या चर्चांना स्वतः अजित पवार यांनीच आज पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. कारण नसताना माझ्याबद्दल आणि माझ्या काही सहकाऱ्यांबद्दल गैरसमज निर्माण केला जात आहे. ज्या बातम्या दाखविल्या जात आहेत, त्यात काहीच तथ्य नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

यानंतर त्यांनी अफवा पसरवणाऱ्या नेत्यांचाही कठोर शब्दांत समाचार घेतला. यावेळी पवारांचा रोख हा शिंदे गट आणि भाजपमधील काही नेत्यांकडे होता. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आनंदाच्या शिधेतून नागरिकांच्या आयुष्याशी खेळ, राष्ट्रवादीचे टीकास्त्र

शिरसाट म्हणाले, आम्ही वक्तव्य करताना नेहमी शांत डोक्यानेच केलं होतं. फक्त जर तरची भाषा वापरली होती. अजित पवार आले तर आम्ही स्वागत करू असे म्हणालो होतो. त्यांना राष्ट्रवादी सोडायची नसेल तर हा त्यांचा प्रश्न आहे.

ते पुढे म्हणाले, की ठाकरे गटाचं मुखपत्र सामना चा रोख त्यांच्या (पवारांच्या) घरातल्या भांडणाकडं होता. त्यामुळे अजित पवारांनी संजय राऊत यांच्यावर चीड व्यक्त केली. संजंय राऊतला त्यांनी तडकावलं आहे. अजित पवारांबद्दल बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांना कुणी दिला. आता राऊत ठरवणार का की अजित पवार यांनी काय केले पाहिजे आणि काय नाही. म्हणून अजित पवार यांनी आज सडकून उत्तर दिले. आता यानंतर तरी ते (संजय राऊत) ध्यानावर येतील, अशी अपेक्षा शिरसाट यांनी व्यक्त केली.

भाजप प्रवेशावर काय म्हणाले अजितदादा? वाचा 10 मुद्द्यांमध्ये

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube