जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त सायबर सेलकडून जनजागृती…

जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अहमदनगरमधील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सायबर सेलच्यावतीने जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. Prakash Ambedkar : औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहताच दंगली थांबल्या… व्यसनांमुळे आयुष्याची दुर्दशा होत असून अंमली पदार्थांच्या सेवनाने कर्करोगासारखे गंभीर आजार होतात याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. तसेच व्यसनांच्या आहारी गेल्यानंतर तरुणांच्या […]

Sachin Ranshi

Sachin Ranshi

जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अहमदनगरमधील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सायबर सेलच्यावतीने जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.

Prakash Ambedkar : औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहताच दंगली थांबल्या…

व्यसनांमुळे आयुष्याची दुर्दशा होत असून अंमली पदार्थांच्या सेवनाने कर्करोगासारखे गंभीर आजार होतात याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. तसेच व्यसनांच्या आहारी गेल्यानंतर तरुणांच्या हातून कशा प्रकारचे गंभीर गुन्हे घडतात, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं आहे.

WC Qualifiers 2023: झिम्बाब्वेने रचला इतिहास, वनडेत 400 चा टप्पा पार; कर्णधार विलियम्सचे द्विशतक हुकले

सचिन रणशेवरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांचे सेवन सेवन करु नये. व्यसनांच्या आहारी गेल्याने तरुणांकडून गंभीर गुन्हे घडत असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना कोणताही शारिरिक मानसिक त्रास होत असेल तर त्यांनी 112 नंबरवर कॉल करुन आमच्याशी संपर्क साधावा, असं आवाहनही विद्यार्थ्यांना केलं आहे.

Air India : “माझी ड्युटी संपली” : 350 प्रवासी अन् विमान जागेवर सोडून पायलट घराकडे

यासोबतच रणशेवरे यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या वापराबाबतही मार्गदर्शन केलं असून अनोळखी व्यक्तींशी संवाद साधल्यानेच मुले सायबर गुन्ह्यांनाही बळी पडत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर जपून करण्याबाबत आवाहन त्यांनी केलं आहे.

या कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांसह जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे आदी उपस्थित होते.

Exit mobile version